Join us

आदर्श सोसायटी प्रकरणी अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध नवे पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 2:12 AM

आदर्श सोसायटी प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध नव्याने काही पुरावे हाती लागल्याचे सीबीआयने उच्च न्यायालयाला मंगळवारी सांगितले.

मुंबई : आदर्श सोसायटी प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध नव्याने काही पुरावे हाती लागल्याचे सीबीआयने उच्च न्यायालयाला मंगळवारी सांगितले. त्यात चौकशी आयोग व उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने नोंदवलेल्या निरीक्षणांचा समावेश आहे.चव्हाण यांच्यावर या प्रकरणी खटला भरण्यास तत्कालीन राज्यपालांनी २०१३ मध्ये नकार दिला. नवे सरकार आल्यानंतर सीबीआयने पुन्हा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे आदेशाचा पुनर्विचार करण्यासाठी अर्ज केला. राज्यपालांच्या संमतीनंतर खटला भरण्याचा मार्ग मोकळा झाला. चव्हाण यांनी त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आयोग व न्यायालयाचे निरीक्षण पुरावे कुठे आहेत?, अशी विचारणा करत न्यायालयाने बुधवारी सुनावणी ठेवली आहे.

टॅग्स :न्यायालय