मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील नव्या सुविधांचं झालं लोकार्पण, प्रवाशांचा मिळणार 'या' सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 12:21 PM2017-12-13T12:21:09+5:302017-12-13T12:42:52+5:30
मध्य , हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील पादचारी पूल मेडिकल रूम, बुकिंग कार्यालय, लिफ्ट, सरकते जिने आणि अत्याधुनिक सुलभ शौचालय या प्रवासी सुविधाचे लोकार्पण करण्यात आलं.
मुंबई : मध्य , हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील पादचारी पूल मेडिकल रूम, बुकिंग कार्यालय, लिफ्ट, सरकते जिने आणि अत्याधुनिक सुलभ शौचालय या प्रवासी सुविधाचे लोकार्पण करण्यात आलं. रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहाइ यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के.शर्मा , पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के.वर्मा आणि मध्य आणि पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपस्थित होते.
तीन वर्षांपासून रेल्वे स्थानकावर परिवर्तन होत आहे. मुंबइ लोकलच्या माध्यमाने 75 लाख प्रवासी प्रवास करतात. रेल्वे आणि मुंबईकरांचे नाते अतूट आहे. मुंबई रेल्वेच्या विकासाचे सर्व प्रकल्प योग्य आणि जलद गतीने पूर्ण होत आहे. विकास कामे करताना प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. लवकरच मुंबईतील रेल्वे प्रवाशाचे सुखद प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचं, रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहाइ यांनी म्हटलं आहे.
या आहेत नव्या सुविधा
करी रोड - पादचारी पूल आणि तिकीट बुकिंग कार्यालय
मुंब्रा, भायखळा - आपत्कालीन वैद्यकीय सुविधा कक्ष
दादर, चेंबूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, रे रोड- प्रत्येकी एक लिफ्ट
भांडूप- उन्नत बुकिंग कार्यालय
नाहूर- पादचारी पूल उन्नत बुकिंग कार्यालय
ठाकुर्ली, टिटवाळा - एक सरकता जिना
कल्याण- अत्याधुनिक शौचालय
चेंबूर, डोंबिवली, घाटकोपर, मुलुंड- वाय फाय सुविधा सुरू
कल्याण- पूर्व आणि पश्चिम दिशेला तीन लिफ्ट
वसई , विरार : अत्याधुनिक शौचालय, लिफ्ट
विरार- पादचारी पूल
दादर, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि अंधेरी - सौर ऊर्जा प्रकल्प
शौचालयाच्या उदघाटन साठी मंत्री का हवा ?
मुंबईतील अनेक रेल्वेच्या विकास कामासाठी महापालिका पैसे देते. मात्र रेल्वे प्रशासनाला शौचालयांच्या देखील उदघटना ला मंत्रीच का लागतो? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. हा पुतळा दर्शनी भागातच असला पाहिजे. टर्मिनसच्या मागे पुतळा उभा केल्यास मुंबईकरांच्या रोषाला सामोरे जावे लागेल , असा इशारा शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी राज्य मंत्र्याच्या उपस्थितीत मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांना दिला.