Join us  

नवे पदपथही फेरीवाल्यांना आंदण

By admin | Published: June 23, 2014 11:29 PM

पूर्वेच्या स्टेशन रोडसह मानपाडा, रामनगर, एमआयडीसी मार्ग येथील हमरस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणासह गटारे दुरुस्तीची पावसाळय़ापूर्वीची कामे सुरू आहेत.

डोंबिवली : पूर्वेच्या स्टेशन रोडसह मानपाडा, रामनगर, एमआयडीसी मार्ग येथील हमरस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणासह गटारे दुरुस्तीची पावसाळय़ापूर्वीची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे पूर्ण होण्याआधीच ठिकठिकाणच्या पदपथांवर दुकानदारांसह फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याने पादचारी पुन्हा रस्त्यांवर आले आहेत. परिणामी, रस्ता रुंदीकरण नावालाच असल्याची नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे.
रामनगर भागातील एसव्ही रोड, राजाजी पथ, मानपाडा, स्टेशन रोड, एमआयडीसी-पाथर्ली परिसर येथे ही स्थिती दिसून येते. आधीच्या गटारांमधील गाळ काढून सध्याचे नादुरुस्त पदपथ पूर्णत: नव्याने बांधून गटारेही बांधण्यात आली आहेत. जेथे गटारे बांधून त्यावर स्लॅब टाकला आहे, तेथे पेव्हरब्लॉक अथवा फरशा बसवण्याआधीच दुकानदार सामान ठेवत असल्याचे दिसते. त्यातच पदपथ आपल्याला आंदण मिळाल्याप्रमाणो फेरीवाल्यांनीही येथे बस्तान मांडले आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणोच नागरिकांना येथे चालायला वाटच नाही. त्यामुळे ते वाट मिळेल तिथून मार्ग काढत आहेत. 
मुळातच अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. ज्या ठिकाणी काम झाले आहे, त्या ठिकाणी मातीचे/अडगळीचे ढिगारे जैसे थे असल्याने पादचारी रस्त्याच्या मधोमध चालत असल्याचे दृश्य मानपाडा रोड, एसव्ही रोड आदी ठिकाणी निदर्शनास येत आहे. अशा स्थितीमुळे वाहनांची कोंडीही वाढत असून, शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. वेळोवेळी संबंधितांना सांगूनही तसेच ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी करूनही त्याचा काहीच परिणाम होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. अनेकांनी महापालिकेच्या ‘ग’ वॉर्ड अधिका:यांना याबाबत सांगितले असूनही काहीही परिणाम झाला नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. (प्रतिनिधी)
 
रस्ता रुंदीकरण केले, नव्याने गटारे बांधली. या कामात तीन-चार महिने गेले. त्याचा नागरिकांना प्रचंड त्रस झाला. हे सगळे नागरिकांसाठी तसेच वाहतूककोंडी कमी करण्यासाठी केले असले तरीही महापालिकेचा उद्देश साध्य झाला आहे का? 
-हरिश्चंद्र गोलतकर, डोंबिवली
 
सुविधा कर देणा:या नागरिकांसाठी आहेत की चिरीमिरी देऊन बस्तान मांडणा:यांसाठी आहेत, याचा तरी पालिका अधिका:यांनी अंतमरूख होऊन विचार करावा 
- हेमंत दातार, डोंबिवली
 
च्नव्याने झालेल्या पदपथांवर फेरीवाल्यांसह दुकानदारांचे सामान असल्याचे आमच्याही निदर्शनास आले आहे. त्यासाठी विशेष कार्यवाही करून आमच्या अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करण्याचे नियोजन सुरू असल्याचे कल्याण - डोंबिवली महापालिकेचे ‘ग’ वॉर्ड प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी सांगितले.