‘एसीबी’बाबत नव्या सरकारचेही ‘ये रे माझ्या मागल्या’ धोरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 05:57 AM2020-03-03T05:57:23+5:302020-03-03T05:57:29+5:30

महाविकास आघाडी सरकारनेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील (एसीबी) महासंचालकपदाच्या नियुक्तीबद्दल त्यांचेच धोरण कायम ठेवले आहे.

The new government's 'come to me' policy on the ACB | ‘एसीबी’बाबत नव्या सरकारचेही ‘ये रे माझ्या मागल्या’ धोरण

‘एसीबी’बाबत नव्या सरकारचेही ‘ये रे माझ्या मागल्या’ धोरण

Next

जमीर काझी 
मुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारनेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील (एसीबी) महासंचालकपदाच्या नियुक्तीबद्दल त्यांचेच धोरण कायम ठेवले आहे. त्यामुळे अनेक वरिष्ठ अधिकारी उपलब्ध असतानाही विभागाचे प्रमुख पद रिक्त ठेवून कनिष्ठाकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचा फडणवीस ‘पॅटर्न’ राबविला जाण्याची भीती अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
मुंबईच्या आयुक्तपदी एसीबीचे प्रमुख परमबीर सिंग यांची शनिवारी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा प्रभार तात्पुरत्या स्वरूपात अप्पर महासंचालक बी. के. सिंग यांच्याकडे दिला आहे. फडणवीस यांनी ५ वर्षांत एकूण तब्बल ८४३ दिवस हे पद पूर्णवेळ अधिकाºयाविना रिक्त ठेवल. सोयीनुसार तेथे महासंचालकांची नियुक्ती केली. आताही ५ डीजी कार्यरत असताना कोणाचीही नियुक्ती न करता पद रिक्त ठेवण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, कर्मचाºयांचे घोटाळे, भ्रष्टाचाराच्या तपासाची जबाबदारी असलेल्या या विभागाचे प्रमुखपद हे पोलीस महासंचालकांनंतरच्या ज्येष्ठ अधिकाºयाकडे सोपविले जात होते. मात्र, डिसेंबर, २०१५मध्ये तत्कालीन सरकारने मुंबईच्या आयुक्तपदाचा दर्जा वाढवून तत्कालीन होमगार्डचे महासमादेशक अहमद जावेद यांची नियुक्ती केली. त्यांच्यानंतर दत्ता पडसलगीकर, सुबोध जायसवाल यांना आयुक्त बनवितानाही सेवाज्येष्ठतेचा तोच निकष कायम होता. मात्र, मागील वर्षी २८ फेबु्रवारीला सरकारने संजय पाण्डेय यांना डावलून संजय बर्वे यांची नियुक्ती केली, तर एसीबीचा कार्यभार हा पदोन्नतीवर परमबीर सिंग यांच्यावर सोपविला. दरम्यानच्या काळात एसीबीचा कार्यभार चार टप्प्यांत तब्बल २ वर्षे ९ महिने १३ दिवस पूर्णवेळ अधिकाºयाविना रिक्त ठेवला. त्यामध्ये सर्वाधिक दोन वर्षे तत्कालीन अप्पर महासंचालक विवेक फणसाळकर यांनी कार्यभार सांभाळला. आता २९ फेबु्रवारीला सिंग यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त ठेवले, त्याला पूर्णवेळ वाली कधी मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
>पाच वर्षांतील अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे अधिकारी
प्रभारी अधिकारी कालावधी दिवस
संजय बर्वे १ मार्च, २०१५ ते २५ एप्रिल, २०१६ ५६
विवेक फणसाळकर ३० जुलै, १६ ते ३० जुलै, १८ ७३०
रजनीश सेठ २ आॅगस्ट ते १८ सप्टेंबर १८ ४६
रजनीश सेठ २८ फेबु्रवारी ते ११ मार्च, २०१९ ११
बी.के.सिंग २८ फेबु्रवारी, २०२० पासून

Web Title: The new government's 'come to me' policy on the ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.