Join us  

नवीन मुख्यालयाला गळतीनवी

By admin | Published: June 17, 2014 1:08 AM

महापालिकेने जवळपास २०० कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या नवीन मुख्यालयामध्ये पहिल्याच पावसात गळती सुरू झाली आहे

मुंबई : महापालिकेने जवळपास २०० कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या नवीन मुख्यालयामध्ये पहिल्याच पावसात गळती सुरू झाली आहे. महापौर कार्यालयाच्या दरवाजासह अनेक ठिकाणी पाणी साचू नये यासाठी बादल्या ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. नवी मुंबई महापालिकेने पामबीच रोडवर भव्य मुख्यालय उभारले आहे. शहरातील लँडमार्क म्हणून या वास्तूकडे पाहिले जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्घाटन केलेल्या इमारतीचे काम अद्याप संपलेले नाही. घुमटामध्ये वॉटरप्रुफिंगचे काम आत्ता सुरू झाले आहे. बांधकामामधील त्रुटीविषयी चौफेर टीका होत असताना आज पहिल्याच पावसात इमारतीच्या अनेक माळ्यांवर गळती सुरू झाली आहे. महापौर दालनामध्ये दरवाजाच्या बाहेर पाणी ठिबकत असून कार्यालयात पाणी जावू नये यासाठी बादली ठेवण्यात आली आहे. सातव्या मजल्यावर जवळपास चार ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे. मुख्यालयाच्या जिन्यामध्येही पाणी गळती सुरू आहे. तीन, चार व पाचव्या मजल्यावर पाणी गळत आहे. झोपडीमध्ये छतामधून पडणारे पाणी साठविण्यासाठी बादली ठेवली जाते. मुख्यालयात विविध ठिकाणी बादल्या ठेवण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)