Join us

नव्या गृहनिर्माण धोरणात प्रीमियम कमी करणार; लोकमत रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह २०२४ मध्ये अतुल सावे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 5:28 AM

लोकमत आणि रुस्तोगी इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित ‘लोकमत रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह २०२४’ मधील चर्चासत्रात अतुल सावे बोलत होते.

मुंबई : राज्य सरकारचा महसूल वाढावा म्हणून अनेक निर्णय घेतले जात असले तरी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन गृहनिर्माण धोरणात प्रीमियम कमी करून गृहनिर्माण क्षेत्राला दिलासा दिला जाईल, अशी घोषणा गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी केली. 

लोकमत आणि रुस्तोगी इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित ‘लोकमत रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह २०२४’ मधील चर्चासत्रात अतुल सावे बोलत होते.

अतुल सावे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की, प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे. भाजप सरकार यासाठी सातत्याने काम करत आहे. म्हाडा आणि इतर प्राधिकरणांच्या माध्यमातून परवडणारी घरे दिली जात आहेत. गिरणी कामगारांनादेखील घरी दिली जात असून, घरांची निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. पुढील वर्षभरात एक लाख घरांची निर्मिती केली जाईल, यासाठी काम सुरू आहे. प्रत्येकाला स्वतःचे घर कसे मिळेल, यासाठी आम्ही सातत्याने काम करीत असून आम्ही आणलेल्या योजनांच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत प्रत्येकाचे स्वतःचे घर असेल, असा आम्हाला विश्वास आहे.

बोरगावकर ग्रुप आणि रिजन्सी इस्पात हे या कार्यक्रमाचे को-प्रेझंटर होते. असोसिएट पार्टनर रुस्तुमजी, व्हर्सेटाइल हाउसिंग आणि नॉलेज पार्टनर सॉलिसिस लेक्स होते. 

टॅग्स :अतुल सावेसुंदर गृहनियोजनभाजपा