‘न्यू इंडिया अ‍ॅश्यूरन्स’कडे २६ हजार कोटींचा प्रीमियम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 06:14 AM2018-12-03T06:14:16+5:302018-12-03T06:14:26+5:30

न्यू इंडिया अ‍ॅश्यूरन्स कंपनी लिमिटेड या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कंपनीने वार्षिक २६ हजार कोटी रुपयांच्या प्रीमियमचा टप्पा पार केला आहे.

'New India Assurance' has a premium of Rs 26,000 crore | ‘न्यू इंडिया अ‍ॅश्यूरन्स’कडे २६ हजार कोटींचा प्रीमियम

‘न्यू इंडिया अ‍ॅश्यूरन्स’कडे २६ हजार कोटींचा प्रीमियम

Next

मुंबई : न्यू इंडिया अ‍ॅश्यूरन्स कंपनी लिमिटेड या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कंपनीने वार्षिक २६ हजार कोटी रुपयांच्या प्रीमियमचा टप्पा पार केला आहे. ९९ वर्षांची परंपरा असलेल्या या कंपनीचा व्यवसाय २८ देशांत विस्तारला गेला आहे. कंपनीची स्थापना १९१९ मध्ये झाली. आता कंपनी शतकोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या काळात मागील चार दशकांपासून कंपनी सातत्याने विमा क्षेत्रात अव्वल आहे. मागील काही वर्षांत कंपनीचा विमा बाजारातील हिस्सा व नफा या दोन्हीमध्ये मोठी वाढ झाली आहे. १७ हजारांहून अधिक कर्मचारी असलेल्या न्यू इंडियाचे आशियातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या देशांमध्ये कार्यालये आहेत. त्याखेरीज आफ्रिका,
कॅराबियन क्षेत्रातील देशांमध्येही कंपनीने उप कंपन्यांमार्फत व्यवसाय सुरू केला आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान जन धन योजनेलाही न्यू इंडिया अ‍ॅश्यूरन्सने वैयक्तिक अपघात विम्याचे कवच देऊन विशेष सहकार्य केले आहे. रुबी कार्डधारकांना कंपनीने हा विमा देऊ केला आहे. याखेरीज ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत कंपनीने उत्तर प्रदेशात १९८ स्वच्छतागृहांची उभारणी केली. त्रिपुरातील दोन जिल्ह्यांत वित्तीय साक्षरता मोहीम राबविण्यात
आली.
कंपनीला अलीकडेच ‘रीडर्स डायजेस्ट’चा विशेष पुरस्कार मिळाला. विमा क्षेत्रातील ‘ट्रस्टेड ब्रँड’ म्हणून न्यू इंडिया अ‍ॅश्यूरन्सचा सन्मान करण्यात आला. न्यू इंडिया अ‍ॅश्यूरन्सने स्वत:ला राष्टÑाच्या विकासातील विश्वासार्ह ब्रँड म्हणून प्रस्थापित केले आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी व ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा ब्रँड ठरला आहे. भारतातील सर्व वर्गांसाठी व सर्व क्षेत्रातील विकासासाठी न्यू इंडिया अ‍ॅश्यूरन्सचे योगदान उल्लेखनीय आहे. वित्तीय क्षेत्रात शतकापासून कार्यरत असलेल्या या कंपनीने राष्टÑाच्या विकासासाठी बहुआयामी कार्य केले आहे. भारतीय सामान्य विमा क्षेत्रातील सर्वात जुन्या असलेल्या या कंपनीने मागील काही वर्षांत महत्त्वाचा दर्जा प्राप्त केला आहे.
न्यू इंडिया अ‍ॅश्यूरन्स हा या उद्योग क्षेत्रातील एक प्रबळ असा ब्रँड ठरला आहे. कंपनीकडे असलेले
उत्पादनांचे वैविध्य हे याचे मुख्य कारण, तसेच ग्राहककेंद्रित दृष्टिकोन बाळगणारे कर्मचारी, यामुळे
कंपनी विमा क्षेत्रात अव्वल स्थान
जपून आहे. यामुळे भारताच्या सामान्य विमा क्षेत्राला सुयोग्य दिशा देण्याचे काम आज न्यू इंडिया अ‍ॅश्यूरन्स कंपनी करीत आहे. यातूनच समर्पक अशा ग्राहकांची फळी कंपनीसाठी उभी झाली आहे, असे ‘रीडर्स डायजेस्ट’ने पुरस्काराच्या सन्मानपत्रात नमूद केले आहे.
>सर्वोत्तम वित्त मानांकन ‘अ’ दर्जा प्राप्त
वित्तीय सक्षमतेसाठी सर्वोत्तम मानांकनाचा ‘अ’ दर्जा
दमदार गुंतवणूक निकाल, तसेच देशांतर्गत व विदेशातील बाजारात सक्षम व्यवसाय
क्रिसिलकडून सातत्याने ‘अअअ’ मानांकन. विमाधारकांना अखंड सेवा देण्यासाठीचे हे सर्वोत्तम मानांकन आहे.ं२०१७-१८ मध्ये कंपनीने आयपीओ आणला. केंद्र सरकारच्या ताब्यातील ९.६० कोटी समाभागांची प्रति समभाग ५ रुपयेनुसार विक्री करण्यात आली. त्याच वेळी २.४० कोटी नवे समभाग बाजारात आणले.
भारतीय सामान्य विमा क्षेत्रात सातत्याने अग्रेसर कंपनीकंपनीच्या समभागांची मुंबई शेअर बाजार
व राष्टÑीय शेअर बाजारात १३ नोव्हेंबर, २०१७ ला यशस्वी नोंदणी.
>कॉर्पोरेट-सामाजिक जबाबदारींतर्गत (सीएसआर) कामे
‘जोखिम संबंधी प्रतिकूल’ या श्रेणीतून भारताला बाहेर काढून ‘जोखमीसंबंधी जागरूक’ देश म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न.
भारतात सामाजिक, पर्यावरणीय व आरोग्याबाबत विचार करणारा एकात्मिक समाज निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला.
‘क्षमता वाढ व सामाजिक सबळीकरण’ हा सामाजिक व आर्थिक विकासाचा पाया सीएसआरअंतर्गत उभा करण्यात आला.पर्यावरण संरक्षण,
ऊर्जा बचत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन व मागास
क्षेत्रांचा विकास याद्वारे केला जात आहे.
स्वच्छ भारत, केदारनाथ उत्थान चॅरिटेबल,
विवेकानंद रॉक मेमोरिअल, पूर्वांचलातील विवेकानंद केंद्र, अक्षय पात्र, चेन्नईतील रामकृष्ण मिशन आश्रम सौर ऊर्जा प्रणाली आदी कार्यांत सहभाग.

Web Title: 'New India Assurance' has a premium of Rs 26,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.