मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे सेवा आणि समर्पण मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम ७ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष तजिंदर सिंह तिवाना यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रीय भारतीय जनता युवा मोर्चा सचिव गौरव गौतम, तेजिंदर सिंह तिवाना, भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई उपाध्यक्ष अर्जुन मेघे यांच्या उपस्थितीत वरळीमध्ये नव भारत जत्रेचा शुभारंभ झाला. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे चित्रण करणारे प्रदर्शन असून, ज्यात त्यांच्या जीवनाची आणि कामांची झलक दाखविण्यात आली. या प्रदर्शनाव्यतिरिक्त रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती तेजिंदर सिंह तिवाना यांनी दिली.
----------------------------------------------