रेसकोर्सवरील थीम पार्कचा प्रस्ताव रखडला वादाला नवीन मुद्दा

By admin | Published: July 24, 2015 02:29 AM2015-07-24T02:29:21+5:302015-07-24T02:29:21+5:30

महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडाच्या कराराचा अहवाल राज्य सरकारच्या भूमी अभिलेखा विभागाने दोन वर्षांपासून दिलेला नाही़ त्यामुळे रेसकोर्सवर

New issue for the controversy over the proposed theme park theme park | रेसकोर्सवरील थीम पार्कचा प्रस्ताव रखडला वादाला नवीन मुद्दा

रेसकोर्सवरील थीम पार्कचा प्रस्ताव रखडला वादाला नवीन मुद्दा

Next

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडाच्या कराराचा अहवाल राज्य सरकारच्या भूमी अभिलेखा विभागाने दोन वर्षांपासून दिलेला नाही़ त्यामुळे रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारण्याच्या शिवसेनेच्या स्वप्नांना मित्रपक्षाच्या असहकार्यामुळेच सुरुंग लागला आहे़ परिणामी, युतीमधील धुसफूस आणखी वाढण्याची चिन्हे आहेत़
या भूखंडासाठी पालिका आणि रॉयल वेस्टर्न टर्फ क्बलमधील करार २०१३मध्ये संपुष्टात आला़ मात्र हा करार वाढवून देण्यास नकार देत सत्ताधारी शिवसेनेने या रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव ठेवला़ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा प्रस्ताव पालिका महासभेत मंजूर करून राज्य सरकारकडे जून २०१३मध्ये पाठविण्यात आला होता़ त्या वेळेस भाजपानेही शिवसेनेला साथ दिली होती़ त्यानंतर राज्य सरकारच्या नगरविकास विभागा-बरोबर पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या़ (प्रतिनिधी)

Web Title: New issue for the controversy over the proposed theme park theme park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.