उद्धव ठाकरेंचा हा 'नया' महाराष्ट्र, हिंदू धर्माला आव्हान देणारं सरकार राज्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 02:41 PM2021-08-18T14:41:51+5:302021-08-18T14:44:43+5:30

राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून जवळपास राज्यात रात्री 10 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यासोबतच, शॉपिंग मॉल आणि इतरही दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अद्यापही प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही

This is the 'new' Maharashtra of Uddhav Thackeray, a government that appeals to Hinduism, says nitesh rane on uddhav thackeray | उद्धव ठाकरेंचा हा 'नया' महाराष्ट्र, हिंदू धर्माला आव्हान देणारं सरकार राज्यात

उद्धव ठाकरेंचा हा 'नया' महाराष्ट्र, हिंदू धर्माला आव्हान देणारं सरकार राज्यात

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार, कारण हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे. हिंदू हो... तो डर के रहो.. ये है उद्धव का "नया" महाराष्ट्र !!, असे ट्विट नितेश राणेंनी केले आहे.

मुंबई - राज्यात अद्यापही प्रार्थनास्थळे उघडण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली नाही. त्यामुळे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. मंदिरं न उघडण्याचं कारण मला अद्याप समजलं नाही. बार आणि मॉलपेक्षा मंदिरात गर्दी कमीच असते, असेही फडणवीस यांनी म्हटलं होत. त्यानंतर, आता मंदिरं न उघडल्याने आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. 

राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून जवळपास राज्यात रात्री 10 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यासोबतच, शॉपिंग मॉल आणि इतरही दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अद्यापही प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून वारंवार मंदिरे उघडण्यासाठी मागणी आणि आंदोलन करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील मंदिरे खुली करावीत, अशी मागणी केली. त्यानंतर, भाजपा नेते आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. 

महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार, कारण हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे. हिंदू हो... तो डर के रहो.. ये है उद्धव का "नया" महाराष्ट्र !!, असे ट्विट नितेश राणेंनी केले आहे. नितेश यांनी आपल्या ट्विटमधून उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करुन देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.   

आम्ही हिंदू आहोत, दगडातही आमचा देव

देवेंद्र फडणवीस हे सांगोल्यात दिवंगत नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याघरी सांत्वनपर भेटीसाठी गेले होते. त्यानंतर, पंढरपूरलाही त्यांनी भेट दिली. त्यावेळी, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, त्यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केली. आम्ही हिंदू आहोत, आमचे 36 कोटी देव आहेत, दगडातही आमचा देव आहे. 'मॉल, बारमध्ये जितकी गर्दी होते, त्यापेक्षा कमी गर्दी ही मंदिरात होते. दारूची दुकानंही सुरू आहेत. खरे तर सामाजिक अंतराचे निकष पाळून मंदिरं सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घेतला पाहिजे. अनेक गरिबांची उपजिविका त्यावर आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

तुषार भोसलेंचीही सरकारवर टीका

भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मंदिर उघडण्याच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. अलीकडेच त्यांनी मंदिराच्या विषयावरुन ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला होता. सगळे खुले केले, मग मंदिर का बंद, अशी विचारणा करत मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो, अशी टीका तुषार भोसले यांनी केली होती. साधू-संतांच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारचं नाव काळया अक्षराने लिहिलं जाईल. कारण संस्कृतीचा सत्यानाश करण्याचे पाप या सरकारने केले आहे. ठाकरे सरकार म्हणजे दारु आणि बार अशीच या सरकारची ओळख झाली आहे, असेही तुषार भोसले यांनी म्हटले. 
 

Web Title: This is the 'new' Maharashtra of Uddhav Thackeray, a government that appeals to Hinduism, says nitesh rane on uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.