मुंबई : मुसळधार पावसाने पुढच्या वर्षीच्या पाण्याचे टेन्शन मिटवले. मात्र भविष्यातील नियोजनासाठी पाणी बचतीचे नवीन धोरण पालिका प्रशासनाने आखले आहे. त्यानुसार नवीन बांधकामांना केवळ घरगुती वापरासाठी पाणी पुरवठा केला जाईल. दुय्यम कामांसाठी बोअरवेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पुन:प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करणे त्यांना बंधनकारक असेल. तसेच निवासी इमारतींना माणशी १३५ लीटर तर व्यावसायिक ग्राहकांना दरडोई ४५ लिटर पुरवठा यापुढे केला जाणार आहे.
मुंबईला दररोज सुमारे ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र ही गरज भागविण्यासाठी महापालिका पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. एखाद्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे संकट ओढवल्यास बोअरवेल व रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे साठवलेले पाणी तारू शकेल. यासाठी पाणी बचतीच्या अनेक प्रकल्पांना गेल्या काही वर्षांपासून पालिका प्रशासन प्रोत्साहन देत आहे. मुंबईकरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळावा, यासाठी पाणी बचतीचे धोरणच अंमलात येणार आहे.असे आहेत काही नवीन नियमच्निवासी इमारतींमधील ग्राहकांना माणशी दररोज ९० लीटर पाणीपुरवठा केला जाणार आहे. तर शौचालयात वापरण्यासाठी ४५ लीटर पाणी मिळणार आहे. व्यावसायिक ग्राहकांना मात्र माणसी २० लीटर अधिक शौचालयासाठी २५ लीटर पाणी पुरवठा केला जाईल.च्सांडपाणी पुन:प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित नसलेल्या निवासी आणि व्यावसायिक इमारतींमधील घरगुती पाण्याची गरज तेवढी भागविण्यात येणार आहे.च्पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी आवश्यक पाण्याची गरज बोअरवेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा प्रकल्पांनी भागविणाºया नवीन इमारतींना केवळ घरगुती गरजांसाठी जलजोडणी दिली जाणार आहे.च्नवीन जोडणीची मागणी आल्यास दुय्यम वापरासाठी पाण्याची कोणती व्यवस्था आहे? हे पाहूनच जोडणी मिळू शकेल.च्सध्या अस्तित्वात असलेल्या जलजोडण्या कमी करून यापुढे दुय्यम कामांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, बोअरवेल आणि पुन:प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या वापरावर भर असणार आहे.