ऑनलाइन लुटण्याचा नवा फंडा; पैसे पाठवून केली जाते लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 12:06 PM2024-02-05T12:06:11+5:302024-02-05T12:06:53+5:30

पैसे पाठवून केली जाते लूट; सायबर हेल्पलाइनवर तक्रारी

New online loot fund; Loot is done by sending money | ऑनलाइन लुटण्याचा नवा फंडा; पैसे पाठवून केली जाते लूट

ऑनलाइन लुटण्याचा नवा फंडा; पैसे पाठवून केली जाते लूट

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑनलाइन लुटण्यासाठी भामटे अनेकदा नवनवीन प्रयोग करत आहेत. हे पुन्हा एकदा समाेर आले आहे. आता तुम्हाला पैशांचे आमिष दाखविण्याऐवजी थेट तुमच्या खात्यात पैसे येतात. हे पैसे आल्यानंतर काही वेळानंतर तेच पैसे मागण्यासाठी फोन येतो आणि ऑनलाइन लुटीला नागरिक बळी पडत आहेत. अशाप्रकारे शहरात अनेकांची लूट झाल्याप्रकरणी सायबर हेल्पलाइनवर तक्रारी करण्यात आल्या आहेत.

लाइट बिल, नोकरीचे आमिष, त्वरित कर्ज, टास्कद्वारे पैशांची कमाई अशा विविध कारणांद्वारे नागरिकांची लूट होती. मात्र, पोलिस, बँकांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे  ऑनलाइन लुटीला बळी पडण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे. यामुळे भामट्यांच्या लुटीच्या जाळ्यात सहजा- सहज नागरिक अडकत नाहीत, हे लक्षात येताच भामट्यांनी नवा फंडा आजविण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या खात्या पैसे पाठवायचे अथवा बँक खात्यात पैसे क्रेडिट झाल्याचा (बँकेकडून येणारा हुबेहूब) मेसेज पाठवला जात आहे.

 ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी हमखास गुगलवर सर्च केले जाते. हॉटेलमधून जेवण मागविणे असो वा कपडे खरेदी करण्यासाठी गुगलवरून मोबाइल नंबर घेतला जातो. 
 हीच संधी साधत भामट्यांनी नामांकित कंपन्या, दुकानांच्या नावाने बोगस वेबसाइट बनविल्या आहेत. 
 त्यामुळे गुगलवरील माहितीची काळजीपूर्वक पडताळणी केल्याशिवाय व्यवहार करावा. 

पैस पुन्हा पाठवा, लिंक पाठवितो 
 तुमच्या बँकखात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत. 
 मी दुसऱ्याला पैसे पाठवित होतो. 
 एमर्जन्सी आहे, कृपया पैस पुन्हा पाठवा, त्यासाठी तुम्हाला लिंक पाठवितो, बँकेचा खाते क्रमांक 
पाठवतो, असे सांगितले जात आहे. 

 गेल्या वर्षभरात १ लाखा ११ हजार ३५७ नागरिक ऑनलाइन लुटीला बळी पडले. 
 यापैकी ९१ हजार ३५७ जणांनी १९३० संपर्क साधला आणि त्यांच्या एकूण लुटलेल्या रकमेपैकी २६ कोटी ४८ लाख २२ हजार २०९ रुपये वाचविण्यात सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. 

बोगस मेसेजने फसवणूक 
असे शब्द कानी पडताच अनेकांनी मेसेजचा इन बॉक्स चेक केला आणि त्यात आलेला बोगस मेसेज वाचून नागरिकांनी भामट्यांना पैसे पाठविलेे आहेत. अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 

आपल्याला येणाऱ्या मेसेजला आला म्हणून त्वरित समोरच्याला पैसे पाठवू नका. इन बॉक्समध्ये आलेल्या एसएमएसची पडताळणी करावी. बँक खात्यात खरोखर पैसे क्रेडिट झाले आहेत का, हे पाहिल्याशिवाय समोरच्याला पैसे पाठवू नका.     - मंगेश भोर, 
    पोलिस उपनिरीक्षक, सायबर गुन्हे

 

Web Title: New online loot fund; Loot is done by sending money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.