Join us

महिलांना नोकरी नाकारण्याची नवीन संधी ‘मीटू’मुळे उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 5:11 AM

‘मीटू’च्या तक्रारींमुळे किती महिलांना न्याय मिळाला याचा अभ्यास करावा लागेल;

मुंबई : ‘मीटू’च्या तक्रारींमुळे किती महिलांना न्याय मिळाला याचा अभ्यास करावा लागेल; मात्र या मोहिमेमुळे नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांना नाकारण्यासाठी आणखी एक सोईस्कर कारण मिळाल्याचे मनुष्यबळ (एचआर) विभागाच्या अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेत समोर आले आहे.मीटू मोहीम सुरू होण्यापूर्वी महिलांना पात्रता असतानादेखील विविध कारणांमुळे नाकारले जात असे; मात्र या मोहिमेनंतर त्यामध्ये आणखी भरपडल्याचा सूर एचआर अधिकाऱ्यांनी आळवला आहे. एच आर क्षेत्रात तब्बल २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या आन्विक्शिकी एच आर सोल्युशन्सच्या शिना राजन म्हणाल्या, महिला कर्मचाºयांना कामावर घेताना त्यांना द्यावी लागणारी प्रसूती रजा, सुरक्षिततेच्या कारणांमुळे अनेक कंपन्यांंमध्ये महिलांना रात्रपाळी करण्यास दिली जात नाही. यामुळे महिलांना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रोजगार नाकारण्याची अनेक प्रकरणे घडत असतात. त्यामध्ये ‘मीटू’मुळे भर पडली आहे.गेल्या पाच वर्षांपासून एच आर म्हणून कार्यरत असलेल्या सिद्धेश वामन यांनी मात्र वेगळे मत व्यक्त केले. मीटू प्रकरणांचा कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. आमच्या कंपनीत पूर्वीपासून स्त्री-पुरुष समानता असून, उमेदवार स्त्री आहे की पुरुष हे पाहण्याऐवजी आम्ही केवळ गुणवत्तेलाच महत्त्व देतो, असे ते म्हणाले.‘मीटू’नंतर अनेक कंपन्यांनी स्त्री उमेदवाराऐवजी पुरुष उमेदवाराला संधी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती एचआरमध्ये कार्यरत असलेल्या काही जणांनी नाव गुप्त ठेवण्याच्याअटीवर दिली. कामात हयगय झाल्यास महिला सहकाºयांना पुरुष सहकाºयांप्रमाणे ओरडल्यास वरिष्ठांविरोधात तक्रारदाखल करण्याचे प्रकारदेखीलघडले असल्याने कामावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे हे संभाव्यप्रकार टाळण्यासाठी महिला उमेदवारांना बाजूला करण्याचा नवा ट्रेंड आल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :जागतिक महिला दिनमहिला