Join us

डेक्कन क्वीनला चढणार नवा साज, लवकरच लागणार नवे डबे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 6:58 AM

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्स्प्रेसला १५ ऑगस्टपासून एक व्हिस्टाडोम कोच जोडला आहे.

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे डेक्कन क्वीनचे लवकरच रूपडे पालटणार आहे.  डेक्कन क्वीनला आता लिंक हॉफमन बुश डबे बसविण्यात आले असून, नव्या रंगात आणि नव्या ढंगात दख्खनची राणी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

मुंबई - पुणेदरम्यान १ जून १९३० रोजी डेक्कन क्विन गाडीचा शुभारंभ ग्रेट इंडियन पेननसुला रेल्वे जीनंतर मध्य रेल्वे झाली. डेक्कन क्वीन मध्य रेल्वेवरून सुटणारी पहिली डिलक्स गाडी होती. सुरुवातीला या गाडीला केवळ ७ डब्यांच्या दोन रॅकसह चालवले जात होते. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्स्प्रेसला १५ ऑगस्टपासून एक व्हिस्टाडोम कोच जोडला आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

असे आहेत नवे डबेडेक्कन क्विनला बसविलेल्या एलएचबी डब्यांमध्ये सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. या गाडीमध्ये एकूण २० डबे आहेत, यामध्ये ४० जणांची जेवणाची व्यवस्था आहे. तसेच नवीन डब्यांचा रंग बदलण्यात आला आहे. त्यामध्ये दख्खनच्या राणीचा ऐतिहासिक वारसा जपून आधुनिकतेचा साज देण्यात आला आहे. प्रत्येक रेक स्कार्लेट मोल्डिंगसह चंदेरी रंगासह सोन्याच्या रेषा आणि रॉयल निळ्या रंगात रंगवले आहे.

मुंबई गारठली  मुंबईत वांद्रेत १५.१, भायखळा १५.२, जुहू १४.९, विक्रोळी १६.३, विद्याविहारमध्ये १४.५ अशं तापमान होते. तर किमान तापमान घसरल्याने  दिवसभर गार वारे वाहत होते.

टॅग्स :रेल्वेपोलिस