Join us  

सिडको उभारणार नवीन पालघर

By admin | Published: December 06, 2015 12:14 AM

पालघर व बोईसरदरम्यान ४४० हेक्टर जमिनीवर सिडको नवीन पालघर शहर वसविणार आहे. यामध्ये जिल्हा मुख्यालयासह सर्व शासकीय इमारतीही उभ्या केल्या जाणार असून, ११० हेक्टरवर

- नामदेव मोरे,  नवी मुंबई पालघर व बोईसरदरम्यान ४४० हेक्टर जमिनीवर सिडको नवीन पालघर शहर वसविणार आहे. यामध्ये जिल्हा मुख्यालयासह सर्व शासकीय इमारतीही उभ्या केल्या जाणार असून, ११० हेक्टरवर निवासी इमारती बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी ३,५८० कोटी रुपये खर्च येणार असून, यासाठीचा प्राथमिक आराखडा सिडकोने तयार केला आहे. शासनाने १ आॅगस्ट २०१४ ला पालघर जिल्ह्णाची घोषणा केली आहे. या जिल्ह्णासाठी मुख्यालयासह सर्व शासकीय कार्यालय असणारे एक शहर वसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासन लवकरच याविषयी अधिकृत निर्णय जाहीर करणार आहे. सिडको प्रशासनाने मागील काही महिन्यांपासून या परिसराच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. वाशीमधील स्मार्ट सिटी प्रदर्शनामध्ये याविषयीचा आराखडा नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. नवीन जिल्ह्णाच्या शासकीय इमारतींसाठी १०३ हेक्टर जमिनीचा वापर केला जाणार आहे. सर्व शासकीय कार्यालये या ठिकाणी असणार आहेत. एकाच परिसरात सुनियोजन पद्धतीने शासकीय कार्यालये असणारा पालघर हा एकमेव जिल्हा होणार आहे. १५,६०० चौरस मीटरवर जिल्हा परिषदेचे मुख्यालय उभे केले जाणार आहे. ३५,६३३ चौरस मीटरवर मुख्य प्रशासकीय इमारत उभी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालय अनुक्रमे १५,६०० व १,०३४ चौरस मीटरवर उभे राहणार आहे. सिडको ११० हेक्टर जमिनीवर नवीन शहर बांधणार आहे. १७ हेक्टर जमिनीवर वाणिज्य संकुल उभारण्यात येणार आहे. पूर्ण शहर वसविण्यासाठी ३,५८० कोटी रुपये खर्च होणार आहेत. या परिसरातील ४४० हेक्टर जमिनीपैकी १९५ हेक्टर जमीन निवासी, वाणिज्य, मिश्र वापर व उद्योगांसाठी विक्री करून सिडको पैसे उभे करणार आहे. या पैशातून नवीन शहर वसविणे, शासकीय कार्यालये उभारण्याबरोबर शासनासही महसूल मिळवून दिला जाणार आहे. नवीन शहरासाठी पाणीपुरवठा, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, गटर व इतर सर्व सुविधांसाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अत्यंत आकर्षक जिल्हा मुख्यालय व शहर वसविण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी या प्रकल्पाविषयीचा आराखडा दाखविला. नागरिकांनाही तो पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. यामुळे पालघर जिल्ह्याच्या व आसपासच्या परीसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्याच प्रमाणे या क्षेत्रातील गृहनिर्माण उद्योगालाही भरभराटीचे दिवस येतील.महत्त्वाच्या इमारती व त्यावरील खर्च वास्तूचे नावक्षेत्रफळकिंमत कोटीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय१५,६००८२.७८ पोलीस अधीक्षक कार्यालय३,९००२०.२१ जिल्हा परिषद इमारत१५,६००८२.७८तीन व्हीआयपी बंगले१,०३४६.३५प्रशासकीय इमारत३५,६३३१९३.४८पोलीस मुख्यालय-५१.९२नाट्यगृह६,५००३९.५१शासकीय विश्रामगृह५,२००३०.३४नवीन पालघर शहराचे नियोजन प्रकल्प हेक्टरनिवासी संकुल - ११० वाणिज्य वापर१७मिश्र वापर५०औद्योगिक वापर१७सार्वजनिक वापर ४०ओपन स्पेस५१वाहतूक५१जिल्हा मुख्यालय१०३ .६७