Join us

डिजिटल व्यवहारांसाठी नवे प्रीपेड साधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 3:52 AM

या साधनाची लोडिंग सुविधा केवळ बँक खात्याशीच जोडली जाऊ शकणार आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँकेने नवे अर्ध बंद स्वरूपाचे ‘प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट’ (पीपीआय) सुरू केले असून, १० हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी डिजिटल वित्तीय व्यवहार करणे त्यामुळे शक्य होणार आहे.

या साधनाची लोडिंग सुविधा केवळ बँक खात्याशीच जोडली जाऊ शकणार आहे. छोट्या डिजिटल वित्तीय व्यवहारांना चालना देण्यासाठी पीपीआय सुविधा जारी करणार असल्याचे सूतोवाच रिझर्व्ह बँकेने या महिन्यातील पतधोरण आढाव्यातच केले होते. त्यानुसार, ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सुविधेचे वैशिष्ट्य असे की, पीपीआयधारकांचा किमान तपशील मिळविल्यानंतर बँक आणि बिगर-बँक पीपीआयदात्यांकडून हे पीपीआय जारी केले जाईल.

टॅग्स :व्यवसायभारतीय रिझर्व्ह बँक