जलतरणपटूंनी रचला नवा विक्रम, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 01:29 AM2019-04-18T01:29:40+5:302019-04-18T01:29:53+5:30

गेटवे ऑफ इंडिया - बेलापूर - धरमतर खाडी असा तब्बल १६१ कि.मी.चा सागरी प्रवास अवघ्या ४३ तास २४ मि. ५५ सेकंदात पार करून सहा जलतरणपटूंनी नवीन विक्रम नोंदवला.

A new record created by swimmers, recorded in the Limca Book of Records | जलतरणपटूंनी रचला नवा विक्रम, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

जलतरणपटूंनी रचला नवा विक्रम, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Next

मुंबई : वाढते तापमान, मध्येच ढगाळ वातावरण, त्यात खवळलेला समुद्र अशा वातावरणात गेटवे ऑफ इंडिया - बेलापूर - धरमतर खाडी असा तब्बल १६१ कि.मी.चा सागरी प्रवास अवघ्या ४३ तास २४ मि. ५५ सेकंदात पार करून सहा जलतरणपटूंनी नवीन विक्रम नोंदवला. सोमवार, १५ एप्रिलपासून दिवसरात्र सागरी रिले जलतरणाचा प्रवास बुधवार, १७ एप्रिलला संपला आणि लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नव्या विक्रमाची नोंद झाली.
डोंबिवलीतील यश जिमखान्यातील १३ ते १७ वयोगटातील कींजल खाटोकर, अथर्व कुलकर्णी, सिद्धी कदम, कशिश टिलवानी, अनघा शिंगाडे, राज पाटील (उरण) यांनी हा गेटवे ते बेलापूर खाडी आणि बेलापूर खाडी ते धरमतर खाडी, असा सागरी प्रवास पूर्ण केला. त्यासाठी महिन्याभरापासून अथक परिश्रमांबरोबरच प्रशिक्षक विलास माने व रवि नवले यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. एरवी ठरावीक वेळासाठीच जलतरणाचे वर्ग घेतले जातात. मात्र, जिमखान्याचे प्रमुख राजू वडनेरकर यांनी मुलांचे सरावातील कौशल्य पाहून त्यांना प्रतिदिन चार ते पाच सराव करण्याची मुभा दिली. तर उरणचे प्रशिक्षक संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना समुद्रात पोहण्याचे विशेष प्रशिक्षण दिले.
सोमवार, १५ एप्रिल रोजी गेटवे आॅफ इंडिया येथून अरबी समुद्राला आव्हान देत जलतरणपटूंनी पाण्यात सूर मारला. आणि एक-एक जण पाण्यात स्थिरावत गेला. गेटवे ते बेलापूर दरम्यान समुद्र खवळला होता. त्यात मोठमोठी जहाजे बंदरात लागत असल्याने विशाल लाटांमध्ये टिकाव धरताना जलतरणपटूंचा चांगलाच कस लागला. बेलापूरवरून रात्री धरमतर अलिबागकडे जाताना मध्येच आभाळ दाटून आले. शिवाय, वादळी वाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाहही बदलत होता. मात्र, तरीही न डगमगता मुलांनी सागरी प्रवास सुरूच ठेवला. धरमतर वरून परतताना करंजा येथे महाकाय लाटांमधून वाट काढताना प्रत्येकाची कसोटी लागली. मात्र, विक्रमाची भुरळ पडलेल्या या सहा जलतरणपटूंनी अथक परिश्रम जिद्दीच्या जोरावर, १७ एप्रिलला सकाळी ९ वाजता गेटवेला आपली सागरी सफर संपवली आणि सलग रात्रंदिवस ४३ तास २४ मि. ५५ सेकंदात तब्बल १६१ कि.मी. सागरी प्रवास अंतर रिले पद्धतीने पार करून ‘नवा लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ केला. या विक्रमवीरांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे निरीक्षक नील लब्दे, सुनील मयेकर उपस्थित होते.

Web Title: A new record created by swimmers, recorded in the Limca Book of Records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.