विश्वास नांगरे पाटलांवर नवी जबाबदारी; राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 11:18 AM2019-02-25T11:18:31+5:302019-02-25T11:22:33+5:30

नांगरे पाटील यांच्याजागी मुंबई दहशवादी विरोधी पथकातील पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची कोल्हापूर विशेष पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

New responsibility on Vishwas Nangare Patil ; IPS officers transfers in the state | विश्वास नांगरे पाटलांवर नवी जबाबदारी; राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

विश्वास नांगरे पाटलांवर नवी जबाबदारी; राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

googlenewsNext

मुंबई - देशातील युपीएससी तरुणांचे आयडॉल आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकलाबदली झाली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. नांगरे पाटील यांच्याजागी मुंबई दहशवादी विरोधी पथकातील पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची कोल्हापूर विशेष पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, नाशिकचे आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांची औरंगाबादला बदली करण्यात आली आहे. याबाबत मंत्रालयातून बदलीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आल्याचे समजते.

राज्यातील 18 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विश्वास नांगरे पाटील यांचाही समावेश आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांचा कार्यकाळ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला असून, सिंघल यांचीही बदली करण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. सिंघल यांची औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आज पदभार स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. तर सिंघल यांच्याजागी नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील हेही आजच आपला पदभार स्विकारू शकतात.  

कोण आहेत विश्वास नांगरे पाटील?

महाराष्ट्रातील तरुणांचं प्रेरणास्थान अन् पोलीस सेवेते बेधडक काम करणारे आयपीएस अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटलांना सर्वच ओळखतात. विश्वास नांगरे पाटील हे मूळचे सांगलीचे आहेत. सांगलीतल्या शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे त्यांचे मूळ गाव आहे. विश्वास नांगरे पाटील यांचा आयपीएस बनण्यापर्यंतचा अतिशय कष्टप्रद होता. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस सेवेत येणाऱ्या तरुणांसाठी विश्वास नांगरे पाटील हे आदर्श आहेत.

विश्वास नांगरे पाटील यांनी आतापर्यंत भूषवलेली पदं

लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक
पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
मुंबई पोलीसदल उपायुक्त
ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
अप्पर(अतिरिक्त -) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग
पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

 

Web Title: New responsibility on Vishwas Nangare Patil ; IPS officers transfers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.