Join us

महाराष्ट्रातून दिल्लीला विमानाने जाणाऱ्यांसाठी नवी नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:06 AM

कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक; अन्यथा १४ दिवसांचे विलगीकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू ...

कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक; अन्यथा १४ दिवसांचे विलगीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे इतर राज्यांनी त्याचा धसका घेतला आहे. दिल्ली विमानतळ प्रशासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली लागू केली आहे. त्यानुसार प्रत्येक प्रवाशाला कोरोना चाचणीचा अहवाल (निगेटिव्ह) सादर करणे बंधनकारक असून, एखाद्या प्रवाशाने सोबत अहवाल आणला नसल्यास त्याला १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल.

देशात आढळणाऱ्या दैनंदिन कोरोनाबाधितांपैकी ४० टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. रुग्णवाढीचे हे प्रमाण पाहता येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे दिल्ली विमानतळ प्रशासनाने सांगितले. कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक असून, संबंधित अहवाल ७२ तासांसाठी वैध मानला जाईल. अहवालात फेरफार केल्याची प्रकरणेही समोर आल्यामुळे खबरदारी म्हणून रॅण्डम पद्धतीने विमानतळावर कोरोना चाचणी करण्यात येईल. या चाचणीदरम्यान प्रवासी बाधित आढळल्यास त्याला विलगीकरणात ठेवण्यात येईल. त्याचप्रमाणे एखाद्या प्रवाशाने अहवाल सोबत आणला नसल्यास त्याला १४ दिवस विलगीकरणात राहण्याची सक्ती केली जाईल. अशा प्रवाशांना होम क्वारंटाइनचाही पर्याय दिला जाईल, असे नियमावलीत नमूद आहे.

......................