Join us  

हार्बर-ट्रान्स हार्बरचे नवीन वेळापत्रक

By admin | Published: January 25, 2016 1:16 AM

मध्य रेल्वेवरील हार्बर आणि ट्रान्स हार्बरवासीयांसाठी २६ जानेवारीपासून नवीन वेळापत्रक लागू केले जाणार आहे. नवीन वेळापत्रकात २९ जादा फेऱ्यांचा समावेश मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे.

मुंबई : मध्य रेल्वेवरील हार्बर आणि ट्रान्स हार्बरवासीयांसाठी २६ जानेवारीपासून नवीन वेळापत्रक लागू केले जाणार आहे. नवीन वेळापत्रकात २९ जादा फेऱ्यांचा समावेश मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे. यात ठाणे-वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बरवर २२ जादा फेऱ्या असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. १४ फेऱ्यांचा विस्तार करतानाच हार्बर, ट्रान्स हार्बरच्या पहिल्या व शेवटच्या लोकल वेळेत आणि महिला विशेष लोकल वेळेतही बदल झाला आहे. ट्रान्स हार्बरवर एक वर्षापूर्वी चार जलद लोकल सुरू करण्यात आल्या होत्या. त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत या लोकल धिम्या लोकल म्हणून चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे या चारही लोकल गाड्यांना आता खांदेश्वर, मानसरोवर, सी-वूड दारावे, जुईनगर, तुर्भे, घणसोली, रबाळे आणि ऐरोली स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. तसेच ट्रान्स हार्बरवरील महिला विशेष लोकल बंद केल्या असून त्यांना अन्य बारा लोकलमध्ये प्रत्येकी तीन डबे महिलांसाठी आरक्षित ठेवले जातील. वडाळा ते पनवेल- वेळ ५.५४ वा.वडाळा ते पनवेल- वेळ २१.३९ सीएसटी ते बेलापूर- वेळ २१.५७ वाशी ते वडाळा- वेळ ५.0२ वा.पनवेल ते वडाळा- २0.२७ वा.बेलापूर ते सीएसटी- २0.५७ वा.पनवेल ते वाशी- २२.४९ वा.हार्बरवरील महिला विशेष लोकलमधील वेळेत बदलपनवेलहून सीएसटीसाठी सुटणारी ८.५0 वाजताची लोकल ८.२२ वाजता सुटेल.पनवेलहून सीएसटीसाठी ८.१२ वाजता सुटणारी अंशत: महिला विशेष लोकल ८.00 वाजता सुटेल. सीएसटीहून पनवेलसाठी सुटणारी १८.0१ वाजताची लोकल १८.0५ वाजता सुटेल.सीएसटीहून पनवेलसाठी सुटणारी १८.१२ वाजताची अंशत: लोकल १८.२६ वाजता सुटेल. >>>>>>>> ट्रान्स हार्बरवरील चार महिला विशेष लोकल बंद करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी बारा लोकलमध्ये प्रत्येकी तीन डबे महिला प्रवाशांसाठी आरक्षित ठेवले जातील. ठाण्याहून पनवेलसाठी सुटणाऱ्या ८.४६, ९.३१ आणि १८.३६ वाजताच्या लोकल.पनवेलहून ठाण्यासाठी सुटणाऱ्या ९.0२, १७.३८ आणि १८.२0 वाजताच्या लोकल.ठाण्याहून वाशीसाठी सुटणाऱ्या ९.१0, ९.५३ आणि १८.१३ वाजताच्या लोकल.वाशीहून ठाण्यासाठी सुटणाऱ्या ८.४६, १७.३८ आणि १८.१८ वाजताच्या लोकल. ठाणे ते पनवेल- वेळ 00.0५ वा.ठाणे ते पनवेल- वेळ ५.१५ वा.ठाणे ते नेरूळ- वेळ ९.४४ वा.ठाणे ते नेरूळ- वेळ ११.५३ वा.ठाणे ते नेरूळ- वेळ १३.१0 वा.ठाणे ते वाशी- वेळ १४.३८ वा.ठाणे ते पनवेल- वेळ १४.५२ वा.ठाणे ते वाशी- वेळ १९.१९ वा.ठाणे ते वाशी- वेळ २0.४३ वा.ठाणे ते वाशी- वेळ २१.३८ वा.ठाणे ते पनवेल- वेळ २३.३२ वा.पनवेल ते ठाणे- वेळ ५.१८ वा.नेरूळ ते ठाणे- वेळ १0.00 वा.नेरूळ ते ठाणे- वेळ १२.३१ वा.नेरूळ ते ठाणे- वेळ १३.५0 वा.वाशी ते ठाणे- वेळ १५.२0 वा.पनवेल ते ठाणे- वेळ १५.५३ वा.वाशी ते ठाणे- वेळ १९.५९ वा.पनवेल ते ठाणे- वेळ २0.३९ वा.वाशी ते ठाणे- वेळ २१.२२ वा.वाशी ते ठाणे - वेळ २२.२३ वा.पनवेल ते ठाणे- वेळ २३.१८ वा.>> हार्बरवरील विस्तार तसेच सुटण्याच्या व पोहोचण्याच्या वेळेत बदलसीएसटीहून १0.0८ वा.सुटणारी वाशी लोकल पनवेलपर्यंत धावेल. वडाळ्याहून ११.४३ वा. सुटणारी पनवेल लोकल सीएसटीहून सुटेल.सीएसटीहून १३.३३ वा. सुटणारी बेलापूर लोकल पनवेलपर्यंत धावेल. बेलापूरहून 0५.00 वा. सुटणारी सीएसटी लोकल पनवेलहून सुटेल. बेलापूरहून १0.५0 वा.सुटणारी वडाळा लोकल सीएसटीपर्यंत धावेल. बेलापूरहून १४.४९ वा.सुटणारी सीएसटी लोकल पनवेलहून सुटेल. वाशीहून १५.२५ वा.सुटणारी वडाळा लोकल पनवेलहून सुटेल. वाशीहून १७.१६ वा.सुटणारी वडाळा लोकल पनवेलहून सुटेल. > ठाण्याहून बेलापूरसाठी सुटणारी २0.११ वा.लोकल पनवेलपर्यंत धावेल. ठाण्याहून बेलापूरसाठी २१.१९ वा. सुटणारी लोकल पनवेलपर्यंत धावेल. ठाण्याहून नेरूळसाठी सुटणारी २२.१५ वा. सुटणारी लोकल पनवेलपर्यंत बेलापूरहून ठाण्यासाठी सुटणारी ७.0१ वा. लोकल पनवेलहून सुटेल.बेलापूरहून ठाण्यासाठी सुटणारी १५.१६ वा. लोकल पनवेलहून सुटेल. नेरूळहून ठाण्यासाठी सुटणारी २३.00 वा. लोकल पनवेलहून सुटेल.> पनवेल ते सीएसटी शेवटची लोकल २३.५९ वाजताच्या ऐवजी 00.0३ वाजता सुटेल. ठाणे ते पनवेल पहिली लोकल ६.२0 च्या ऐवजी सव्वापाच वाजता सुटेल. ठाणे ते पनवेल शेवटची लोकल २२.५२ ऐवजी 00.0५ वाजता सुटेल. पनवेल ते ठाणे शेवटची लोकल २१.५२ ऐवजी २३.१८ वाजता सुटेल. वाशी ते ठाणे शेवटची लोकल २३.१0 ऐवजी २३.२५ वाजता सुटेल.