Join us

‘मरे’चे नवीन वेळापत्रक

By admin | Published: November 13, 2014 1:45 AM

मध्य रेल्वेच्या मेन लाईनचा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बो:या वाजत आहे. या पाश्र्वभूमीवर त्रसलेल्या प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेने आपल्या नविन वेळापत्रकातून केला आहे.

15 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी : मेन लाइन प्रवाशांना मिळणार दिलासा 
मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाईनचा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बो:या वाजत आहे. या पाश्र्वभूमीवर त्रसलेल्या प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेने आपल्या नविन वेळापत्रकातून केला आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनचे नविन वेळापत्रक 15 नोव्हेंबरपासून लागू होत आहे. यात छोटय़ा मार्गांर्पयत धावणा:या लोकल सेवेचा प्रवाशांची गर्दी आणि मागणी पाहता विस्तार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणो ठाणो आणि कल्याणर्पयत नविन  फे:यांची भर पाडून त्यांनाही दिलासा दिला 
आहे. 
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील प्रवाशांना सकाळी आणि संध्याकाळी  प्रवास करताना मोठय़ा प्रमाणात गर्दीला सामोरे जावे लागते. सध्या दुपारीही गर्दीला असते. महत्वाची बाब म्हणजे मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर छोटय़ा मार्गार्पयत असणा:या लोकल फे:यांचा प्रवाशांना काहीच फायदा होताना दिसत नाही. एकूणच सर्व बाबी पाहता मध्य रेल्वेने मेन लाईनच्या प्रवाशांना दिलासा देताना छोटय़ा मार्गार्पयत धावणा:या लोकल फे:यांचा विस्तार करण्यावर अधिक भर दिला आहे. अंबरनाथ ते सीएसटी, सीएसटी ते कुर्ला दरम्यानच्या चार फे:याही रद्द करण्यात आल्या आहेत. कल्याण खोपोली दरम्यान चार नविन फे:या सुरु करण्याचा निर्णयही घेतला आहे. कल्याण ते दादर, कल्याण ते ठाणो, खोपोली ते कर्जत आणि कर्जत ते खोपोली या ट्रेनचा समावेश आहे. ठाणो ते कल्याणच्या प्रवाशांना मोठा दिलासा देताना 13 फे:या वाढवण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
 
रद्द झालेल्या फे:या
22.18ची अंबरनाथ-सीएसटी लोकल
00.18ची सीएसटी-कुर्ला लोकल 
22.52ची अंबरनाथ-सीएसटी लोकल
00.34ची सीएसटी-कुर्ला लोकल   
 
जलद मार्गावर लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून त्यामुळे वेळेची बचत होणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान लोकलचा वेग वाढवताना सीएसटी ते कल्याण भागात दोन मिनिटांची, कल्याण ते कर्जत भागात चार मिनिटांची आणि कल्याण ते कसारा भागात पाच मिनिटांची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले. 
हार्बर आणि ट्रान्स हार्बर जैसे थे
हार्बर आणि ट्रान्स हार्बरचे वेळापत्रक 2013 मध्येच बदलले होते. त्यामुळे यंदा फक्त मेन लाइनच्या वेळापत्रकातच बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. हार्बर आणि ट्रान्स हार्बर सेवा व्यवस्थित सुरू असून वक्तशीरपणात हे दोन्ही मार्ग पुढे असल्याचे सांगण्यात आले. 
 
वेगमर्यादा 1क्क् किमी
लोकल कल्याण-खोपोली आणि कल्याण-कसारा विभागात सीएसटी ते कल्याणच्या सर्व जलद लोकल डीसी-एसी आणि एसी-डीसी म्हणून धावतील. त्यांची वेगमर्यादा ही ताशी 100 किमी एवढी असेल. 
 
नवीन अतिरिक्त फे:या
कल्याण-दादर लोकल कल्याणहून 9.16 वाजता सुटेल आणि दादरला 10.25 वाजता पोहोचेल
कल्याण-ठाणो लोकल कल्याणहून 11.07 वाजता सुटेल आणि ठाणो स्थानकात 11.38 वाजता पोहोचेल. 
खोपोली-कर्जत लोकल खोपोलीहून 21.07 वाजता सुटेल आणि कर्जतला 21.32 वाजता पोहोचेल. 
कर्जत-खोपोली लोकल कर्जतहून 21.40 वाजता सुटेल आणि खोपोलीला 22.05 वाजता पोहोचेल. 
 
शेवटची लोकल 
आठ मिनिटे आधी
सीएसटीहून सुटणा:या शेवटच्या लोकलच्या वेळेत बदल होणार आहे. कामावरुन मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतणा:या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. शेवटची लोकल मध्यरात्री 12.38 वाजता सोडण्यात येते, मात्र 15 नोव्हेंबरपासून साडे बारा वाजता सोडली जाणार आहे. पहिली सीएसटी-कसारा लोकलही 4.05 ऐवजी 4.12 वाजता सोडण्यात येणार आहे. 
 
बदलापूरहून 05.49, 06.14 आणि 06.47 वाजता ट्रेन सोडण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळेत कल्याण ते दादर अशी एक जादा लोकल फेरीही सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. 
 
फे:यांचे विस्तारीकरण
च्5.52 वाजता सुटणारी कल्याण-सीएसटी लोकल आता टिटवाळ्य़ाहून 5.36ला सुटेल
च्6.50 वाजता सुटणारी टिटवाळा-कुर्ला लोकल सीएसटीर्पयत धावेल
च्9.02 वाजता सुटणारी बदलापूर-दादर लोकल सीएसटीर्पयत धावेल
च्7.10 वाजता सुटणारी आसनगाव-कल्याण लोकल सीएसटीर्पयत 
च्17.00 वाजता सुटणारी सीएसटी-ठाणो लोकल कल्याणर्पयत धावेल
च्17.04 वाजता सुटणारी सीएसटी-कुर्ला लोकल ठाणोर्पयत धावेल
च्18.17 वाजता सुटणारी सीएसटी-कुर्ला लोकल कल्याणर्पयत धावेल 
च्20.05 वाजता सुटणारी कुर्ला-डोंबिवली लोकल कल्याणर्पयत 
च्5.21 वाजता सुटणारी कल्याण-सीएसटी लोकल अंबरनाथहून 05.05 वाजता सुटेल 
च्05.46 वाजता सुटणारी अंबरनाथ-सीएसटी लोकल आता बदलापूरहून 05.41 वाजता सुटेल 
च्6.40 वाजता सुटणारी कल्याण-सीएसटी लोकल आता बदलापूरहून 6.14 वाजता सुटेल
च्9.04 वाजता सुटणारी ठाणो-कर्जत लोकल आता सीएसटी 8.29 वाजता सुटेल
च्21.49 वाजता सुटणारी सीएसटी-कल्याण लोकल बदलापूर्पयत धावेल
च्21.42 वाजता सुटणारी सीएसटी-डोंबिवली लोकल कल्याणर्पयत धावेल
च्22.38 वाजता सुटणारी सीएसटी-अंबरनाथ लोकल बदलापूर्पयत 
च्21.56 वाजता सुटणारी 
कर्जत-ठाणो लोकल सीएसटीर्पयत धावेल