नवीन सिंग शिवसेनेच्या वाटेवर!
By admin | Published: October 4, 2015 02:35 AM2015-10-04T02:35:05+5:302015-10-04T02:35:05+5:30
केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ काँग्रेसच्या नगरसेवकांनीही पक्ष सोडण्याचा निर्धार केला आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्र्रेसचे ज्येष्ठ
डोंबिवली : केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ काँग्रेसच्या नगरसेवकांनीही पक्ष सोडण्याचा निर्धार केला आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्र्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजी शेलार यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. तर गेल्या १०-१२ दिवसांपासून पक्षाचे स्वीकृत नगरसेवक नवीन सिंग हे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संपर्कात असून डोंबिवलीच्या विष्णूनगर येथून त्यांनी शिवसेनेतून तिकीट मागितल्याचीही माहिती
आहे.
सिंग हे अनेक वर्षांपासून सरनाईकांच्या संपर्कात आहेत. केडीएमसी निवडणुका जाहीर झाल्यावर सिंग यांनी तातडीने सरनाईकांश्ी चर्चा करून शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी पक्षांतर केल्यास काँग्रेसला आणखी एक धक्का बसू शकतो. त्यामुळे डोंबिवलीतील काँग्रेसची फळी कमकुवत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सिंग यांनी ज्या भागातून तिकीट मागितले आहे, त्या भागासाठी शिवसेनेचेही अनेक कार्यकर्ते-पदाधिकारी इच्छुक आहेत. त्यांना डावलून यांना उमेदवारी कशी दिली जाणार, सेनेला त्याचा फटका बसणार की फायदा होणार, पक्षश्रेष्ठी नेमकी काय भूमिका घेतात, याची आता सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू आहे.
नवीन हा माझा जुना कार्यकर्ता आहे. त्याने काही दिवसांपासून शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली. जो उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचा असेल, तसेच सेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांचा आधी विचार केला जाईल. त्यानंतर श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो अंतिम असेल. नवीनला यासंदर्भात पूर्ण कल्पना देण्यात आली आहे. - प्रताप सरनाईक, आमदार, ठाणे
निवडणूक काळात आॅफर येत असतात. निश्चितच त्या पक्षाकडूनही विचारणा झाली होती, पण निर्णय अजून झालेला नाही. काँग्रेसला मी दोन जागांवर तिकीट देण्याबाबत सांगितले आहे. - नवीन सिंग, काँग्र्रेस