नवा नारा : अन्न सुरक्षा-शेतापासून ताटापर्यंत

By Admin | Published: April 7, 2015 05:24 AM2015-04-07T05:24:27+5:302015-04-07T05:24:27+5:30

अन्नपदार्थांमध्ये रासायनिक पदार्थ टाकून व्यापाऱ्यांकडून मोठ्याप्रमाणात भेसळ करण्यात येत असते. सध्या जागतीक बाजारपेठेसह भारतामध्ये

New slogan: Food security - From farm to plate | नवा नारा : अन्न सुरक्षा-शेतापासून ताटापर्यंत

नवा नारा : अन्न सुरक्षा-शेतापासून ताटापर्यंत

googlenewsNext

सुरेश लोखंडे, ठाणे
अन्नपदार्थांमध्ये रासायनिक पदार्थ टाकून व्यापाऱ्यांकडून मोठ्याप्रमाणात भेसळ करण्यात येत असते. सध्या जागतीक बाजारपेठेसह भारतामध्ये देखील मोठ्याप्रमाणात भेसळ होऊन नागरिकांना विविध स्वरूपांच्या रोगाना सामोरे जावे लागत आहे. त्यास आळा घालण्यासाठी ७ एप्रिल या जागतिक आरोग्य दिनाचे या वर्षभरासाठी ‘अन्न सुरक्षा - शेतापासून ताटापर्यंत’ हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. या दृष्टीने ग्राहकांसह नागरिकांमध्ये अन्न पदार्थांसंदर्भात वर्षभर जनजागृती केली जाणार आहे.
जागतीक बाजारपेठेत आॅलीव्ह आॅईल, दूध, मध, केशर, संत्रा ज्यूस, कॉफी व सफरचंदाचा ज्यूस इत्यादी सात प्रकारच्या अन्न पदार्थांंमध्ये भेसळ होत आहेत. तर भारतामध्ये दूध, खवा, तूप, गरम मसाले, लाल मिरची भेसळ, पावडर, हळद, चहा, पावडर, डाळी, मोहरी, पनीर, इत्यादी पदार्थांमध्ये अन्न भेसळ आढळून आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारच्या अन्न भेसळीमुळे बद्धकोष्टता, वंध्यत्व येणे किंवा कॅन्सर
सारख्या गंभीर आजारांसह २०० पेक्षा अधिक आजाराना सामोरे जावे लागत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गौरी राठोड व ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनावणे यांनी जागतिक दिनाच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट केले आहे.
जादा नफा कमविण्याच्या हव्यासापोटी अन्न पदार्थ शेतापासून ते ग्राहकांजवळ येईपर्यंत सर्वच ठिकाणच्या व्यापारीकरणामुळे त्यावर रासायनिक प्रक्रिया करून भेसळ केली जाते. किटकनाशकांची फवारणी केली जाते, पदार्थ टिकवण्यासाठी रसायनांचा वापर, अन्न पदार्थ आकर्षक दिसण्यासाठी धान्यांची पॉलिशिंग, कलरिंग बिनधास्तपणे केली जाते.
यामुळे पोषक तत्वाचा मोठ्याप्रमाणात ऱ्हास होऊन अनेक दुर्धर आजारांना देखील सामोरे जावे लागत. यास आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून कडक कारवाई होऊनही ते अद्यापही अटोक्यात येत नाही.
यासाठी असली व नकली ओळखण्यासाठी अन्नातील भेसळ टाळण्यासाठी जनजागृती होणार असून या मोहिमेकरिता या वर्षासाठी अन्न सुरक्षा - शेतापासून ते ताटापर्यंत हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.

Web Title: New slogan: Food security - From farm to plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.