मुंबई : मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाडीबंदरच्या कोचिंग डेपोमध्ये ‘स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग’ युनिट्स बसविले आहेत. त्यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्यातील वीजपुरवठा करणाऱ्या डब्यांची तपासणी सोपी होणार आहे. कोचिंग डेपोमध्ये स्थापित केलेली ही अशा प्रकारची पहिलीच सुविधा आहे.
‘पॉवर कार’ रेल्वेच्या संपूर्ण डब्यांसाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करते. ते डब्यांमधील दिवे, पंखे, वातानुकूलन यंत्रणा, मोबाइल चार्जिंग पॉइंट यासारख्या विविध घटकांना वीज पुरवते. देखभाल दुरुस्तीनंतर पाॅवर कारची क्षमता व व्होल्टेजची तपासणी किंवा चाचणी करताना वेळ लागत होता.
चार युनिट्ससाठी ३८ लाख रुपयांची गुंतवणूक वाडीबंदर व लोकमान्य टिळक टर्मिनस कोचिंग डेपो दुरुस्ती मार्गिकेवर प्रत्येकी दोन युनिट्सची उभारणी करून मध्य रेल्वेने तांत्रिक प्रगती आणि परिचालन कार्यक्षमतेसाठी आपली वचनबद्धता सार्थ दर्शविली आहे. प्रत्येक स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिटच्या देखभालीसाठी, किफायतशीर अशा ९.५ लाख रुपये दराने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाडीबंदर कोचिंग डेपोत दुरुस्ती मार्गिकेवर सध्या कार्यरत असलेल्या सर्व चार युनिट्ससाठी एकूण ३८ रुपये लाखांची गुंतवणूक झाली आहे.