Join us

मुंबईसाठी नवीन टीडीआर धोरण

By admin | Published: November 18, 2016 7:34 AM

मुंबई शहरासाठी हस्तांतरीय विकास हक्काचे (टीडीआर) धोरण नगरविकास विभागाने जाहीर केले आहे.

मुंबई : मुंबई शहरासाठी हस्तांतरीय विकास हक्काचे (टीडीआर) धोरण नगरविकास विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार, विकासकाने बांधलेल्या इमारतीलगत असलेल्या रस्त्याच्या रुंदीवरून जादा टीडीआर दिला जाईल. एका जागेचा एफएसआय अन्य जागी वापरणे याला टीडीआर असे म्हटले जाते. नवीन धोरणानुसार, ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांलगतच्या बांधकामांना सर्वाधिक टीडीआर मिळेल. ९ ते १२ मीटर रुंदीच्या रस्त्यालगतच्या बांधकामावर पूर्वीप्रमाणेच २ चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळेल. तथापि, १२.२ ते १८.३ मीटर रुंदीच्या रस्त्यालगत २ ते २.२ एफएसआय टीडीआर स्वरूपात मिळेल. १८.३ मीटर ते ३० मीटर रुंदीच्या रस्त्यालगत २ ते २.४ इतका एफएसआय टीडीआर म्हणून मिळेल. ३० मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यावर तो २ ते २.५ राहील. ९ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांलगतच्या बांधकामांवर सवलत दिली जाणार नाही. राज्याच्या इतर भागासाठी टीडीआरचे धोरण काही महिन्यांपूर्वीच आणले. मात्र, मुंबईसाठीच्या धोरणाची प्रतीक्षा होती. याआधी मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकाम होऊन व्यवस्थेवर ताण पडेल, या भीतीने टीडीआर दिला जात नव्हता. तो आता मिळेल. (विशेष प्रतिनिधी)