टीबीसाठी नव्या लसीची आवश्यकता - तज्ज्ञांचे मत

By Admin | Published: March 23, 2015 02:01 AM2015-03-23T02:01:56+5:302015-03-23T02:01:56+5:30

टीबीने भारतालाच नाही तर जगाला ग्रासले असून, टीबी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. टीबी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्राथमिक अवस्थेतच त्याच्यावर उपचार होणे आवश्यक आहे.

New vaccine requirement for TB - Expert opinion | टीबीसाठी नव्या लसीची आवश्यकता - तज्ज्ञांचे मत

टीबीसाठी नव्या लसीची आवश्यकता - तज्ज्ञांचे मत

googlenewsNext

मुंबई : टीबीने भारतालाच नाही तर जगाला ग्रासले असून, टीबी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. टीबी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्राथमिक अवस्थेतच त्याच्यावर उपचार होणे आवश्यक आहे. टीबीला प्रतिबंध करण्यासाठी नव्या लसीची निर्मिती होण्याची आवश्यकता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी व्यक्त केली आहे.
टीबीच्या विषाणूंच्या गुणसूत्रांमध्ये बदल होत आहेत. या बदलांमुळे टीबी वाढत आहे. विषाणूंच्या गुणसूत्रात होणाऱ्या बदलांमुळे टीबीसाठी नवीन लसीची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षात अशाप्रकारे नवीन लस येईल असे चिन्ह नाही. संशोधन सुरू असेल, पण परिणामकारक लस यायला अजूनही काही काळ जावा लागणार असल्याचे मत श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. झरीर उदवाडिया यांनी सांगितले.
‘बेडाक्विलिन’ हे औषध टीबी रुग्णासाठी उपयुक्त असल्याचे संशोधनातून समोर येत आहे. पण भारतात परवानगी नसल्याने हे औषध थेट रुग्णांना उपलब्ध होत नाही. डॉ. उदवाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणाऱ्या ११ रुग्णांना कंपनीने औषध दिले होते. एका रुग्णाला एचआयव्ही एड्स आणि टीबी या दोन्ही आजारांनी ग्रासले होते. संशोधनाचा एक भाग म्हणून त्याच्यावर ‘बेडाक्विलिन’ देण्यात आले. दीड वर्षांपूर्वी हा रुग्ण बरा झाल्याची माहिती डॉ. उदवाडिया यांनी दिली. (प्रतिनिधी)

‘बेडाक्विलिन’ हे औषध
‘बेडाक्विलिन’ या औषधाच्या आजही क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. यामुळे हे औषध घेण्यासाठी रुग्णाची, डॉक्टरांची आणि कंपनीची परवानगी घेणे आवश्यक आहे. पण, कंपनी आता हे औषध वापरायला परवानगी देत नाही. चेन्नई येथील टीबीवर अभ्यास करणाऱ्या इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेतील डॉ. सोमय्या स्वामिनाथन यांनी केलेल्या अभ्यासतही नमूद केले आहे.

Web Title: New vaccine requirement for TB - Expert opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.