मोकाट जनावरांसाठी पालिका घेणार नवीन वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 05:28 AM2017-08-16T05:28:30+5:302017-08-16T05:28:32+5:30

भटक्या जनावरांना पकडून कोंडवाड्यात सोडण्यासाठी वापरण्यात येणारी वाहने बाद झाली आहेत.

New vehicle to take a municipal corporation | मोकाट जनावरांसाठी पालिका घेणार नवीन वाहन

मोकाट जनावरांसाठी पालिका घेणार नवीन वाहन

Next

मुंबई : भटक्या जनावरांना पकडून कोंडवाड्यात सोडण्यासाठी वापरण्यात येणारी वाहने बाद झाली आहेत. मात्र नवीन वाहने खरेदीचा प्रस्ताव तयार होण्यास तब्बल आठ महिने लोटले. या काळात भटक्या जनावरांमुळे वाहतूक कोंडीची तक्रार वाढल्याने अखेर वाहन खरेदीचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. महिन्याभरात ही वाहने पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
वृद्ध झाल्यानंतर सोडलेल्या गाई व बैल तसेच श्वान अशा भटक्या जनावरांना पकडून केटल इम्पाऊंडिंग वाहनद्वारे कोंडवाड्यात सोडले जाते. मात्र या वाहनांचे आठ वर्षांचे आर्यमान ३१ डिसेंबर २०१६ रोजी संपले. त्यामुळे नवीन वाहन खरेदी करेपर्यंत भटक्या जनावरांना पकडण्याची मोहीम बारगळली होती. परिणामी भटक्या जनावरांना त्रास वाढला होता. भटकी जनावरे रस्त्याच्या मध्यभागी बसणे, रस्त्यावर चालणे असे प्रकार घडत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत ेअसे. त्यामुळे तातडीने चार नवीन वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलो. प्रत्येकी २९ लाख ३० हजार अशा चार वाहनांसाठी एक कोटी १७ लाख खर्च होणार आहेत.
या रहिवाशांना दिलासा
मालाड, गोरेगाव, कांदिवली, कुर्ला, मानखुर्द, भांडूप, घाटकोपर येथील भटक्या जनावरांना पकडून कोंडवाड्यात सोडणे या वाहनांमुळे शक्य होणार आहे.

Web Title: New vehicle to take a municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.