नववर्षालाच हाणामाऱ्या

By admin | Published: March 22, 2015 10:26 PM2015-03-22T22:26:50+5:302015-03-22T22:26:50+5:30

रायगड जिल्ह्यात साजरा होत असतानाच अलिबाग तालुक्यातील ताजपूर(रेवदंडा), शिळगाव (खोपोली), राबगाव (पाली) व सावेळे(कर्जत) या गावांमध्ये सशस्त्र मारामाऱ्या सुरू होत्या.

New Year only | नववर्षालाच हाणामाऱ्या

नववर्षालाच हाणामाऱ्या

Next

जयंत धुळप ल्ल अलिबाग
गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष स्वागताचा आनंदोत्सव रायगड जिल्ह्यात साजरा होत असतानाच अलिबाग तालुक्यातील ताजपूर(रेवदंडा), शिळगाव (खोपोली), राबगाव (पाली) व सावेळे(कर्जत) या गावांमध्ये सशस्त्र मारामाऱ्या सुरू होत्या. या सर्व मारामाऱ्यांमध्ये एकूण १८ ग्रामस्थ जखमी झाले आहेत. संबंधित पोलीस ठाण्यांनी एकूण ४८ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करून १४ जणांना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली.
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजपूर या गावी शनिवारी मारामारी जागेच्या वादातून झाली. या मारामारी प्रकरणी ताजपूर पोलीस पाटील अशोक कृष्णा पाटील व ग्रामस्थ शंकर पोश्या पाटील यांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्याने रेवदंडा पोलिसांनी ताजपूर पोलीस पाटील अशोक कृष्णा पाटील यांच्यासह शंकर पाटील, राजेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, नितेश पाटील, निखिल पाटील, नारायण धर्मा पाटील या सात जणांना अटक केली.
यात गंभीर जखमी झालेल्या सुशील जाधव यास एमजीएम कामोठे रुग्णालयात दाखल केले, तर दुसऱ्या गटाचे नरेश जाधव, अनंता जाधव, दिनेश जाधव, सतीश जाधव, रमेश जाधव यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात, तर गंभीर राहुल जाधव यास कामोठे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिळगावात अंगणातील झाडे मुलांनी तोडल्याने रिक्षाचालक रियाज कलबसकर यांना शनिवारी रात्री नऊ वाजता बेदम मारहाण झाली. खोपोली पोलिसांनी फातिमा गोळे, निसार गोळे, सलमा शेख, शकिल शेख, जाकीर शेख यांच्यासह अन्य आठविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाली तालुक्यातील राबगावमध्ये डीजे साऊंड सिस्टीम बंद करण्याच्या अरेरावीतून शुक्रवारी रात्रीच्या मारामारीत संतोष भोईर, संकेत भोईर, विलास भोईर, निखिल झोलगे, तुकाराम भोईर हे पाच ग्रामस्थ जखमी झाले असून संकेत भोईर व तुकाराम भोईर यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले

मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या किरकोळ बोलाचालीचे पर्यवसान कर्जत तालुक्यांतील सावेळे बौद्धवाडा येथे शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता लाठ्याकाठ्या, लोखंडी शिगा यासहच्या सशस्त्र मारामारीत झाले. १२ जण गंभीररीत्या जखमी झाले. सचिन जाधव व नरेश जाधव यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार कर्जत पोलिसांनी उभयगटाच्या रमेश जाधव, दिनेश जाधव, विलास जाधव, अमोल जाधव, संजय जाधव, योगेश जाधव, अक्षय जाधव यांना आतापर्यंत ताब्यात घेतले.

Web Title: New Year only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.