नववर्षात स्कूल बस संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 05:26 AM2017-12-29T05:26:52+5:302017-12-29T05:27:03+5:30

मुंबई : नववर्षात स्कूल बस संघटना विद्यार्थी अवैध वाहतुकीचा मुद्दा अधिक आक्रमकतेने मांडण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे.

New year school bus organization aggressive | नववर्षात स्कूल बस संघटना आक्रमक

नववर्षात स्कूल बस संघटना आक्रमक

Next

मुंबई : नववर्षात स्कूल बस संघटना विद्यार्थी अवैध वाहतुकीचा मुद्दा अधिक आक्रमकतेने मांडण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर विद्यार्थी वाहतूकदारांवर कारवाई न करण्यासाठी २ जानेवारीपासून १५ दिवसांची मुदत देण्यात येईल. या मुदतीअंती संबंधित वाहतूकदारांवर कारवाई न झाल्यास २० जानेवारी २०१८पासून संपावर जाण्याचा इशारा स्कूल बस मालक संघटनेतर्फे देण्यात येत आहे. त्याचबरोबर संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वाहतूक पोलीस यांच्यावर ‘कर्तव्यात कसूर’ म्हणून खटले दाखल करू, अशी माहिती संघटनेने दिली.
मुंबईसह नवी मुंबईत एकूण
१ हजारपेक्षा अधिक शाळा
आहेत. बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतुकीसाठी बस अथवा अन्य वाहने आहेत. विशेष म्हणजे ६० टक्के वाहनांमध्ये विद्यार्थी वाहतुकीबाबत शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवतात. शाळांसोबत करार व परमिट नसणे, सुरक्षेसंबंधी उपाययोजना या गोष्टींचा
समावेश नाही. मात्र स्कूल बस ओनर्स संघटना शासनाच्या नियमांप्रमाणे विद्यार्थी वाहतूक करते. बहुतांशी जीप, टेम्पो, ट्रॅव्हलर, मिनीबस यांच्यामधून अवैध विद्यार्थी वाहतूक होते.
शाळा व्यवस्थापन आणि अधिकृत वाहतूकदारांकडून शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी अवैध वाहतूकदारांवर कडक कारवाईची आवश्यकता आहे. परिणामी २ जानेवारीपासून अशा वाहतूकदारांवर कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन सचिव आणि परिवहन आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) मनोज सौनिक यांना पत्र देण्यात आले. या पत्राची प्रत वाहतूक पोलीस उपायुक्त यांच्यासह सर्व प्रादेशिक परिवहन आयुक्तांनाही देण्यात आली आहे. अवैध विद्यार्थी वाहतूकदारांवर कारवाई न झाल्यास २० जानेवारीपासून बेमुदत संप करण्यात येईल, अशी माहिती संघटनेचे अनिल गर्ग यांनी दिली.
>तेरा हजार परमिट
वाहतूक आयुक्त कार्यालयाने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार १३ हजार ७४८ स्कूल व्हॅनला परमिट देण्यात आले आहे. मात्र मुंबईतील ७६ शाळांचा सर्व्हे केला असता, येथील एकूण स्कूल व्हॅनची संख्या २९ हजार ४४० इतकी असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. तर राज्यात स्कूल व्हॅनची संख्या दीड लाखाहून अधिक आहे.

Web Title: New year school bus organization aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा