जगभर उभारण्यात आली नववर्षाची गुढी

By admin | Published: April 10, 2016 01:04 AM2016-04-10T01:04:19+5:302016-04-10T01:04:19+5:30

नोकरी-व्यवसायानिमित्त जगभर पसरलेल्या मराठी नागरिकांनी घरासमोर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. विदेशात गेल्यानंतरही मातृभुमीची ओढ कायम असल्याने नववर्षाचे

New Year's Achievement | जगभर उभारण्यात आली नववर्षाची गुढी

जगभर उभारण्यात आली नववर्षाची गुढी

Next

नवी मुंबई : नोकरी-व्यवसायानिमित्त जगभर पसरलेल्या मराठी नागरिकांनी घरासमोर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. विदेशात गेल्यानंतरही मातृभुमीची ओढ कायम असल्याने नववर्षाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. स्वित्झर्लंड, डेन्मार्कसह अनेक ठिकाणी पुढील आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
ढोलताशांचा गजर, नववर्ष स्वागत यात्रांनी पूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेला होता. घरासमोर गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले. जगभर कर्तृत्वाची गुढी उभारणाऱ्या मराठी नागरिकांनी विदेशातही नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. घरासमोर रांगोळी काढून पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. अनेकांनी मार्केटमधून रेडीमेड गुढी विकत घेऊन विधिवत पूजा केली. प्रत्येक देशातील महाराष्ट्र मंडळाच्यावतीनेही पुढील आठवडाभर नववर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्वित्झर्लंडमधील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्यावतीने निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. मराठीचे महत्त्व - माझा दृष्टिकोन, सहजीवन एक व्याख्या, माहितीचा विस्फोट - शाप की वरदान? या विषयांवर ५०० शब्दांमध्ये निबंध लिहून मागविला आहे. आपली संस्कृती व भाषेचे महत्त्व समजावे, यासाठी हे विषय निबंध स्पर्धेसाठी निवडले आहेत. १० एप्रिलला चैत्र पाडव्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे. दुपारी दोन ते पाचदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचा ‘आमचा पोपट वारला’ या एकपात्री कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे.
सिंगापूरमधील महाराष्ट्र मंडळही प्रत्येक सण व उत्सव उत्साहामध्ये साजरा करीत असतात. तेथे स्थायिक झालेल्या मराठी नागरिकांनी सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देऊन पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला. नववर्षानिमित्त सर्वांना एकत्र येता यावे यासाठी १० एप्रिलला स्वराभिषेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये पंडित शौनक अभिषेकी यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डेन्मार्कमधील महाराष्ट्र मंडळानेही ९ एप्रिलला नववर्षानिमित्त कार्यक्रम आयोजन केला आहे. प्रतिभा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. पारंपरिक वेषामध्ये नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. स्कॉटलँड महाराष्ट्र मंडळाने होलिंग हार्मनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डॉक्टर व रुग्णांच्या संगीतमय कार्यक्रमाला स्कॉटलंडमधील सर्व मराठी नागरिक उपस्थित राहणार आहेत. कर्करोगतज्ज्ञ डॉ. शेखर कुलकर्णी यांच्या या कार्यक्रमामध्ये शिल्पा कर्णिक, स्वाती देव, ओजस वाधवा हे कलाकार सहभागी होणार असून, दृकश्राव्य माध्यमातून नसिरुद्दीन शाह व विक्रम गोखले सहभागी होणार आहेत. दुबईमधील मराठी नागरिकही गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करतात. प्रत्येकाच्या घरी जाऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

डेन्मार्क
महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क यांच्यावतीने ९ एप्रिलला प्रतिभा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये डेन्मार्कमधील सर्व मराठी नागरिकांना आमंत्रित केले आहे.

स्वित्झर्लंड
बृहन्महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडच्यावतीने ‘मराठीचे महत्त्व माझा दृष्टिकोन, सहजीवन एक व्याख्या व माहितीचा विस्फोट - शाप की वरदान? या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. १० एप्रिलला सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांच्या एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सिंगापूर
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर यांच्यावतीने १० एप्रिलला चैत्र पाडव्यानिमित्त स्वराभिषेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शौनक अभिषेकी यांची संगीत मैफील होणार आहे.

येथील मराठी नागरिकांनी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. महाराष्ट्र मंडळ स्कॉटलंड यांनी डॉक्टर व रुग्ण सादर करीत असलेला हिलींग हार्मनी हा आगळ्या वेगळ्या कार्यकमाचे १७ एप्रिलला आयोजन केले आहे. २०१२ पासून गुढीपाढव्यानिमीत्त सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
- सचिन जपे,
महाराष्ट्र मंडळ स्कॉटलंड

सिंगापूरमध्ये आम्ही सर्व मराठी सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करीत असतो. गुढीपाडवाही पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असून, यावर्षी १० एप्रिलला शौनक अभिषेकी यांच्या स्वराभिषेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
- आदिती, जनसंपर्क अधिकारी,
सिंगापूर महाराष्ट्र मंडळ

दुबईमध्ये मराठी नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. आम्ही घरासमोर गुढी उभारून प्रत्येकाच्या घरी जाऊन नववर्षाच्या शुभेच्छा देतो. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात.
- शहाजी माळी, दुबई

Web Title: New Year's Achievement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.