लोकल प्रवाशांना नवीन वर्षाची भेट
By admin | Published: January 1, 2016 01:47 AM2016-01-01T01:47:00+5:302016-01-01T01:47:00+5:30
मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून लोकल प्रवाशांना नवीन वर्षाची खास भेट मिळणार आहे. मध्य रेल्वेकडून ४० सरकते जिने विविध स्थानकांवर उपलब्ध होणार आहेत. शिवाय ४० प्लॅटफॉर्मचीही
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून लोकल प्रवाशांना नवीन वर्षाची खास भेट मिळणार आहे. मध्य रेल्वेकडून ४० सरकते जिने विविध स्थानकांवर उपलब्ध होणार आहेत. शिवाय ४० प्लॅटफॉर्मचीही उंचीदेखील वाढविण्यात येणार आहे. प.रे.कडूनही उपनगरीय लोकलचे नवे वेळापत्रक १ जानेवारीच्या मध्यरात्रीपासूनच लागू होणार आहे. यात १३ लोकल फेऱ्यांचा विस्तार करतानाच, ११ लोकल फेऱ्यांचा वेगदेखील नव्या वर्षात प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार आहे.
सरकत्या जिन्यांचा होणारा वापर पाहता, २०१६ मध्ये आणखी ४० सरकते जिने मध्य रेल्वे उपलब्ध करून देणार आहे. यात एमआरव्हीसीकडूनही बांधण्यात येणाऱ्या काही सरकत्या जिन्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील सीएसटी, दादर, कुर्ला, एलटीटी, विद्याविहार, घाटकोपर, कांजुरमार्ग, भाडुंप, मुलुंड, ठाणे, ठाकुर्ली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, लोणावळा येथे सरकते जिने बसवण्यात येतील, तर हार्बरवरील डॉकयार्ड, वडाळा आणि मानखुर्द स्थानकात नवीन सरकते जिने उपलब्ध होणार असल्याचे, मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेने १ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून उपनगरीय मार्गाचे नवीन वेळापत्रक लागू केले आहे. यात १३ लोकल फेऱ्यांचा विस्तार होणार आहे, तर ११ फेऱ्यांचा वेग वाढविल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. विस्तार झालेल्या सेवांमध्ये अंधेरी-वसई लोकल चर्चगेटहून, चर्चगेट-वांद्रे लोकल बोरीवलीपर्यंत, चर्चगेट-वसई लोकल विरारपर्यंत, बोरीवली-नालासोपारा लोकल अंधेरी-विरार म्हणून यापुढे धावणार आहे.
चर्चगेट-वांद्रे लोकल भार्इंदरपर्यंत आणि बोरीवली-भार्इंदर लोकल नालासोपारापर्यंत जाईल. विरार-अंधेरी व वसई-अंधेरी या दोन ट्रेन चर्चगेटपर्यंत धावतील, तसेच वसई-चर्चगेट ट्रेन, बोरीवली-चर्चगेट आणि अंधेरी-चर्चगेट ट्रेन विरारहून सुटतील, असे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
प.रे.वर ११ लोकल फेऱ्यांचा वेग वाढणार
पश्चिम रेल्वेवर अकरा लोकल फेऱ्यांचा वेग वाढणार आहे. त्यामुळे चार ते नऊ मिनिटांची बचत होईल. यातील दहा ट्रेन या विरार-चर्चगेट दरम्यान, तर एक ट्रेन विरार-दादर दरम्यान धावणार आहे.
प्लॅटफॉर्मची
उंची येथे वाढणार
कुर्ला, डॉकयार्ड, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, सानपाडा, बेलापूर, तुर्भे, मस्जिद, वाशी, जुईनगर, खारघर, नेरुळ, कॉटनग्रीन.