नववर्षाचे जंगी स्वागत

By admin | Published: March 29, 2017 06:24 AM2017-03-29T06:24:07+5:302017-03-29T06:24:07+5:30

गुढीपाडवा साजरा करताना हिंदू नववर्षाचे जंगी स्वागत करत मुंबईकरांनी मंगळवारी जिवाची मुंबई केली. पारंपरिक

New Year's Warranty Welcome | नववर्षाचे जंगी स्वागत

नववर्षाचे जंगी स्वागत

Next

मुंबई - गुढीपाडवा साजरा करताना हिंदू नववर्षाचे जंगी स्वागत करत मुंबईकरांनी मंगळवारी जिवाची मुंबई केली. पारंपरिक वस्त्रांमध्ये मुंबई शहरासह उपगनरांतील शोभायात्रांत सामील झालेल्या तरुणाईसह बच्चेकंपनी आणि प्रौढांनी एकच धमाल केली. दरम्यान, दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह मोबाइल, टीव्ही, फ्रीज अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणाऱ्या मुंबईकरांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीला सर्वाधिक पसंती दिल्याचे निदर्शनास आले.

महिलांमुळे चार चाँद
मुंबईतील शोभायात्रांत खरा उत्साह भरला तो महिलावर्गाने. ठिकठिकाणच्या शोभायात्रांत लहान मुलींपासून वृद्ध महिलाही नऊवारी साड्या, पारंपरिक दागिने, भगवे फेटे परिधान करून सामील झाल्या होत्या. दुचाकींवर स्वार झालेल्या महिलांसोबत फोटो काढण्यासाठी तर पुरुषही गर्दी करत होते.

साड्यांच्या फेट्यांनी वेधले लक्ष
पांढऱ्या शुभ्र सदऱ्यांसह रंगबेरंगी सदऱ्यांवर साड्यांचे फेटे बांधलेले पुरुष लक्ष वेधून घेत होते. भगव्या फेट्यांसह हाती भगवा पताका घेऊन नाचणाऱ्या तरुणाईने शोभायात्रांचा उत्साह शिगेला पोहोचवला.

गिरगावात शौर्यदर्शन
हिंदू नववर्ष स्वागतयात्रेसाठी हजारो मुंबईकर सकाळीच घराबाहेर पडले होते. गिरगावात नववर्ष स्वागतासाठी दोन शोभायात्रा निघाल्या होत्या. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या बरोबरीनेच शिवसेनेनेही स्वागतयात्रा काढली होती. शिवसेनेच्या यात्रेत केलेली हनुमानाची मोठी प्रतिकृती तर प्रतिष्ठानने तयार केलेली बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रतिकृतीने गिरगावकरांचे लक्ष वेधले.

गोराईमध्ये जल्लोष...

गोराईमध्येही जल्लोष व उत्साही वातावरणात शोभायात्रा पार पडली. पारंपारिक वेशभूषेमधील तरुणाई आणि त्यांना तेवढीच साथ दिलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे शोभायात्रेला रंगत आली होती. तरुणांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या स्वयम् युवा प्रतिष्ठान व आम्ही मावळेच्या वतीने सलग ८व्या वर्षी ही स्वागतयात्रा पार पडली.

अंधेरी आरटीओला ७१ लाखांचा महसूल

मुंबई - ताडदेव, अंधेरी, बोरीवली आणि वडाळा आरटीओपैकी बोरीवली डेप्युटी (उप) आरटीओत सर्वात जास्त वाहनांची नोंदणी गुढीपाडव्याच्या दिवशी झाली. मात्र वाहन नोंदणीत बोरीवली आघाडीवर असले तरी महसूल जास्त मिळवण्यात अंधेरी आरटीओ आघाडीवर राहिले आहे. अंधेरी आरटीओला तब्बल ७१ लाखांहून अधिक महसूल मिळाला आहे. या आरटीओला चारचाकी वाहन नोंदणीतूनच ६८ लाखांहून अधिक महसूल मिळालेला आहे.

Web Title: New Year's Warranty Welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.