रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 02:07 AM2018-02-21T02:07:49+5:302018-02-21T02:07:51+5:30
ओशिवरा येथे रुग्णालयाचा हलगर्जीपणा आणि अपुºया स्टाफमुळे नुकताच एका नवजात बालकाला जीव गमवावा लागला आहे. रुग्णाचे नातेवाईक मोहम्मद आरिफ यांनी या
मुंबई : ओशिवरा येथे रुग्णालयाचा हलगर्जीपणा आणि अपुºया स्टाफमुळे नुकताच एका नवजात बालकाला जीव गमवावा लागला आहे. रुग्णाचे नातेवाईक मोहम्मद आरिफ यांनी या सगळ्या प्रकारासाठी मॅटर्निटी होमच्या भोंगळ कारभाराला जबाबदार धरले आहे.
आदर्शनगर, ओशिवरा येथे राहणाºया ३० वर्षीय निखत मलिक यांचे नाव या प्रसूतिगृहात नोंदविण्यात आले होते. निखत यांची नियमित आरोग्य तपासणी होत होती आणि त्यात बाळ सुदृढ असल्याचे दिसत होते. १० फेब्रुवारीला निखतची जेव्हा तपासणी झाली तेव्हा तिला सांगण्यात आले की १-२ दिवसांत प्रसूती होईल. १२ फेब्रुवारीला निखतला प्रसूती वेदनांसह प्रचंड रक्तस्राव होऊ लागला. त्यामुळे आम्ही तिला ओशिवरा मॅटर्निटी होममध्ये दाखल केले. येथे पोहोचल्यानंतर तब्बल २० मिनिटांनी डॉक्टर पोहोचले. तोपर्यंत बाळाची पल्स रेट कमी झाली होती. आम्हाला सांगण्यात आले की रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ओशिवरा मॅटर्निटी होममध्ये कुठल्याही प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध नसते; या सगळ्यामध्ये आमचा दीड तास वाया गेला आणि निखतच्या शरीरातून पुष्कळ रक्त वाहून गेले. त्यानंतर १० मिनिटांनी आलेल्या रुग्णवाहिकेत डॉक्टरही नव्हते. त्यानंतर तिला कूपरमध्ये हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता, असे रुग्णाचे नातेवाईक आरिफ यांनी सांगितले.
विधिमंडळ महिला हक्क आणि बाल कल्याण समितीने मुंबईतील अनेक रुग्णालयांना नुकतीच भेट दिली होती. वर्सोव्याच्या भाजपा आमदार आणि समितीच्या अध्यक्ष डॉ. भारती लव्हेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, वर्सोवा येथील आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना ओशिवरा मॅटर्निटी होम जवळ आहे. ओशिवरा मॅटर्निटी होममधील जनरल ओपीडी आणि नर्सिंग होम अद्ययावत करावे; तसेच येथे पुरेसा स्टाफ उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी मी महानगरपालिकेकडे गेली तीन वर्षे सातत्याने करीत आहे. या प्रकरणी आयुक्त अजय मेहता यांच्याकडे दाद मागितली आहे. ओशिवरा मॅटर्निटी होमच्या भोंगळ कारभाराविरोधात आपण येत्या विधानसभेत लक्षवेधी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.