राजू काळे ल्ल भाईंदर
येथील बालाजीनगर, रेल्वे परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचे लोकार्पण ऑगस्टमध्ये झाल्यानंतर ती बंदावस्थेत असल्याचे समोर आले आहे. आधीच या चौकीसमोर एक पोलीस चौकी असताना केवळ राजकीय हेव्यादाव्यांतून नवीन चौकीची निर्मिती केल्याने त्यावरील खर्चाचा अपव्यय झाल्याचा सूर निघत आह़े
येथील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया यांच्या सुमारे 3 लाखांच्या नगरसेवक निधीतून 5 डिसेंबर 2क्क्6 रोजी पाणपोईशेजारीच पोलीस चौकी बांधली आहे. 2क्क्7 मध्ये या चौकीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तेथे एकही कर्मचारी तैनात करण्यात आला नव्हता. त्यामुळे या चौकीच्या निर्मितीत निधीचा अपव्यय झाल्याचे स्पष्ट झाले. परंतु, कर्मचा:यांखेरीज तेथील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी गाडोदिया यांच्याच सुमारे 1 लाखाच्या निधीतून 1 एप्रिल 2क्12 रोजी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्याचे नियंत्रणही त्याच चौकीतून सुरू करण्यात आले. त्यानंतरही या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आला नाही. अगोदरच एक चौकी असताना सध्याचे राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांच्या सुमारे 4 लाखांच्या नगरसेवक निधीतून त्या चौकीसमोरच गृहविभागाच्या परवानगीखेरीज केवळ पालिकेच्याच परवानगीने नव्याने पोलीस चौकी बांधण्यात आली. परंतु, हा केवळ राजकीय स्टंटबाजीचाच प्रकार असून त्यात जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या चौकीचे लोकार्पण 4 ऑगस्ट रोजी स्थानिक पोलीस अधिका:यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते उरकण्यात आले. परंतु, जुन्यासह नव्याने बांधण्यात आलेली चौकीसुद्धा पोलीस कर्मचा:यांअभावी बंदावस्थेत असल्याने येथील नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. तसेच या चौकीला लागूनच भाईंदर रेल्वे स्थानक असल्याने जुन्या चौकीच्या काळात येथील परिसरात लुटालुटीच्या अनेक घटना घडल्या आहेत. (प्रतिनिधी)