ग्रामसेवकाविरुद्ध कारवाईसाठी निवेदन बातमीचा जोड
By admin | Published: December 12, 2014 11:49 PM
त्यानंतर सभेत सुरुवातीस उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत राजेश बाळकृष्ण बावणे, शे.शब्बीर शे.अहमद , आनंदा तोताराम दामोदर व विलास वामन दामोदर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी राजेश बावणे व शे.शब्बीर शे.अहमद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आनंदा दामोदर व विलास दामोदर हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उरले होते. त्यांच्यातून उपसरपंच निवडीसाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. या मतदानात आनंदा तोताराम दामोदर यांना पाच मते तर विलास वामन दामोदर यांना सहा मते मिळाली.अशाप्रकारे विलास दामोदर हे बहुमतांनी पुन्हा उपसरपंचपदी निवडून आले; परंतु ही निवडणूक झाल्यानंतर ग्रामसेवक डहाके यांनी विलास दामोदर हे निवडणुकीस उभे राहण्यास पात्र नसताना त्यांचा अर्ज वैध ठरवून मुंबई ग्रा.पं.अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) चे उल्लंघ्
त्यानंतर सभेत सुरुवातीस उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत राजेश बाळकृष्ण बावणे, शे.शब्बीर शे.अहमद , आनंदा तोताराम दामोदर व विलास वामन दामोदर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी राजेश बावणे व शे.शब्बीर शे.अहमद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आनंदा दामोदर व विलास दामोदर हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उरले होते. त्यांच्यातून उपसरपंच निवडीसाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. या मतदानात आनंदा तोताराम दामोदर यांना पाच मते तर विलास वामन दामोदर यांना सहा मते मिळाली.अशाप्रकारे विलास दामोदर हे बहुमतांनी पुन्हा उपसरपंचपदी निवडून आले; परंतु ही निवडणूक झाल्यानंतर ग्रामसेवक डहाके यांनी विलास दामोदर हे निवडणुकीस उभे राहण्यास पात्र नसताना त्यांचा अर्ज वैध ठरवून मुंबई ग्रा.पं.अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) चे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा परिषद व पंचायत समिती सेवा व शिस्त नियमातील तरतुदीनुसार निलंबनाची कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन ग्रा.पं.सदस्य आनंदा तोताराम दामोदर, राजेश बाळकृष्ण बावणे, मनोहर सदांशिव जमेवार व श्रीकृष्ण रामकृष्ण गाडे यांंनी एका तक्रार अर्जाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.अकोला यांच्याकडे केली आहे. या निवडणुकीसाठी झालेल्या ग्रा.पं.सदस्यांच्या विशेष सभेच्या कामकाजाच्या वृत्तांत पुस्तिकेत ग्रामसचिव तथा निवडणूक अधिकारी डहाके यांनी बावणे यांनी विलास दामोदर यांना निवडणुकीस अपात्र ठरविण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाचा उल्लेख करीत विभागीय आयुक्तांनी त्यांच्या अपात्रतेबाबत दिलेल्या आदेशात पुढील कार्यकालाबद्दल स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली, असे नमूद केले आहे, हे विशेष. आता मुख्य कार्यकारी अधिकारी या अर्जावर काय कार्यवाही करतात, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)