मुंबई : वृत्तपत्र विक्रेत्यांनी एकजूट दाखवून आपल्या हक्कांसाठी चळवळ उभी केली तर वृत्तपत्र विक्रेत्यांना निश्चितच न्याय मिळेल. शिवाय, आवश्यकता असेल तेथे आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संरक्षण व हक्कासंदर्भात नुकतीच परळ येथील मैत्रेय सभागृहात निर्धार सभा पार पडली. या निर्धार सभेत सभागृहात बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या विक्रेत्यांना बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष व उद्योगमंत्री देसाई यांनी या वेळी मार्गदर्शन केले. आजवरच्या अनेक समस्यांना वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपल्या एकीच्या माध्यमातून लढा दिला आहे. त्यामुळे ही एकी टिकवून ठेवण्याचे आवाहन देसाई यांनी याप्रसंगी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना सुरक्षिततेचे आश्वासन दिले होते. खुद्द साहेबांनी यासंदर्भात गंभीर दखल घेऊन विक्रेत्यांची फेरीवाल्यांमध्ये गणना करू नये, असेही बजावले होते.मात्र तरीही निरपराध विक्रेत्यांवर अन्याय होणे ही गंभीर बाब असून याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून लवकरच विक्रेत्यांना न्याय मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सभेसाठी संघाचे सरचिटणीस हरी पवार सहसचिव रवीचिले, संजय पावशे, कार्याध्यक्ष मधू सदडेकर, जयवंत डफळे, खजिनदार भाऊ राणे, राजू धावरे, मनोहर परब, मधू मालकर, सदा नंदुर, संतोष पाडावे, सिद्धेश चव्हाण,अरुण जाधव, अजय उतेकर, दिलीप चिचोळे, धर्मेंद्र कुशवाहा, दीपक कदम, विष्णू सावंत, ठाण्यातून अनुपकुमार प्रजापती आदी मान्यवरांनी सहकार्य केले.
वृत्तपत्र विक्रेत्यांना लवकरच न्याय मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 2:52 AM