वृत्तपत्र विक्रेते अत्यावश्यक सेवेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:06 AM2021-04-13T04:06:44+5:302021-04-13T04:06:44+5:30
वृत्तपत्र विक्रेते अत्यावश्यक सेवेतच लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आपले संरक्षण व सहकार्य करण्यास आम्ही तत्पर आहोत, असे पोलीस ...
वृत्तपत्र विक्रेते अत्यावश्यक सेवेतच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपले संरक्षण व सहकार्य करण्यास आम्ही तत्पर आहोत, असे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रमुख प्रतिनिधींनी सांगितले. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रमुख प्रतिनिधींनी पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना आभार पत्र देऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
आज मितीस संपूर्ण मुंबई शहरात अंदाजे दहा हजार व ठाणे जिल्ह्यात पाच हजार लहान-मोठे वृत्तपत्र विक्रेते पिढ्यानपिढ्या आपला वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलबाबत सहआयुक्तांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या सर्व विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला. वृत्तपत्र विक्रेता हा अत्यावश्यक सेवेतील एक महत्त्वाचा घटक आहे याची जाणीव त्यांनी पुन्हा एकदा करून दिली त्याबद्दल वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सर्व प्रतिनिधींनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष-संजय चौकेकर, कृष्णकांत (बाळा) पवार, जीवन भोसले, वृत्तपत्र एकीकरण समितीचे प्रमुख अजित पाटील व घनशाम यादव उपस्थितीत होते.