Join us

वृत्तपत्र विक्रेत्यांचे उद्या मुंबईत अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 3:06 AM

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन २७ जानेवारी रोजी मुंबई येथे होत आहे. या अधिवेशनास सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो वृत्तपत्र विक्रेते सहभागी होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सल्लागार शिवगोंड खोत, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी व संघटन सचिव रघुनाथ कांबळे, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, मारूती नवलाई यांनी दिली.

सांगली : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन २७ जानेवारी रोजी मुंबई येथे होत आहे. या अधिवेशनास सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो वृत्तपत्र विक्रेते सहभागी होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सल्लागार शिवगोंड खोत, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी व संघटन सचिव रघुनाथ कांबळे, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, मारूती नवलाई यांनी दिली.वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी व वृत्तपत्र विक्रेता-एजंट कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी यासह विविध मागण्यांवर चर्चा करून ठोस निर्णय या मेळाव्यात घेण्यात येणार आहे. मुंबईतील परेळ येथील शिरोडकर हॉल येथे शनिवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत होणाºया या मेळाव्यास राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील गावा-गावातीलविक्रेते व एजंट उपस्थित राहणार आहेत.खोत आणि सूर्यवंशी म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातूनही जास्तीत जास्त विक्रेते-एजंट यांनी उपस्थित रहावे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना ही एजंट-विक्रेते यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असणारी संघटना आहे. विक्रेत्यांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी आवाज उठवला आहे. वृत्तपत्र व्यवस्थापनासह शासनाकडे सतत पाठपुरावा करीत प्रश्न मार्गी लावले आहेत. यापुढेही अनेक कामे करण्याची आहेत. त्यासाठी एकजूट आवश्यक आहे. हीच एकजूट महाराष्ट्राच्या मेळाव्यात दाखवायची आहे.