न्यूजप्रिंट, इतर साहित्य झाले महाग; वृत्तपत्राच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 05:46 AM2022-04-14T05:46:34+5:302022-04-14T05:46:47+5:30
रशिया-युक्रेन युद्धामुळे न्यूजप्रिंट आणि इतर साहित्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून, वृत्तपत्र व्यवसाय संकटात सापडला आहे.
नवी दिल्ली :
रशिया-युक्रेन युद्धामुळे न्यूजप्रिंट आणि इतर साहित्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून, वृत्तपत्र व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे अनेक वृत्तपत्र व्यवस्थापनांना वृत्तपत्रांच्या किमती वाढवणे भाग पडले आहे. उत्तर प्रदेशमधील सर्व मोठ्या वृत्तपत्रांनी सोमवार ते गुरुवार असे चार दिवस किमतीत १ रुपयाने वाढ केली आहे.
ॲागस्ट-सप्टेंबर २०२० ते एप्रिल, २०२२ या दीड वर्षांमध्ये न्यूजप्रिंट आणि शाईच्या किमतीत अडीच पट वाढ झाली आहे. न्यूज प्लेटच्या किमतीतही ४० रुपये प्रति प्लेट दराने वाढ झाली आहे. म्हणजेच जी प्लेट दीड वर्षांपूर्वी १६० रुपयांना मिळत होती ती आता २०० रुपयांना मिळत आहे. वीज, डिझेल आणि अन्य वस्तूंच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम वृत्तपत्राच्या खर्चावर होत आहे.
महागाईचा फटका केवळ भारतीय वृत्तपत्रांवरच होत नसून जगभरातील इतर देशांमध्येही अशीच स्थिती आहे. श्रीलंकेमध्ये तर गेल्या काही दिवसांत एक वृत्तपत्र बंद करावे लागले. इतर देशांमध्ये वृत्तपत्रांची किंमत भारताच्या तुलनेत अधिक आहे.
भारतात वृत्तपत्र सध्या नाममात्र दरात मिळते. यामुळे वृत्तपत्र चालवण्यासाठी येणाऱ्या काही दिवसांत वृत्तपत्रांच्या किमतीत वाढ करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे संकेत मिळत आहेत.
आयातीमुळे फटका
भारतात प्रामुख्याने तीन देशांतून वृत्तपत्रांचा कागद येतो. भारताला ४० टक्के कागद रशियातून, ४५ टक्के कॅनडातून तर १५ टक्के कागद फिनलँड येथून येतो. जागतिक युद्धजन्य स्थितीमुळे कागद आयातीला फटका बसला असून, न्यूजप्रिंटच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
देशभरात विविध देशांमध्ये वृत्तपत्रांची असलेली किंमत
अमेरिका
द न्यूयॅार्क टाइम्स (२४ पाने)
३ डॉलर (२२८ रुपये)
रविवारी ६ डॉलर (४५७ रु)
इंग्लंड
- द गार्डियन
२.५ पाउंड (२४८ रुपये)
- सॅटरडे अँड संडे गार्डियन
२.५ पाउंड (३४७ रुपये)
- फायनान्शियल टाइम्स
३.१० पाउंड (३०७ रुपये)
- द डेली टेलिग्राफ
२.८० पाउंड (२७७ रुपये)
- द टाइम्स
२.२० पाउंड (२१८ रुपये)
बांगलादेश
- प्रथम आलो वांग्ला
(१८ पाने) १० टका
- द डेली स्टार
(२० पाने) १२ टका
- ढाका ट्रिब्युन
(१६ पाने) १२ टका
जपान
- द जपान टाइम्स
६५०० जापानी येन
(३,९४५ रु. महिना)
श्रीलंका
- डेली न्यूज
(२० पाने) ३० रुपये
- एडीए
२० रुपये
पाकिस्तान
(किंमत पाकिस्तानी रुपयात)
- द एक्सप्रेस ट्रिब्युन
(१८ पाने) ४० रुपये
- डॉन (१८ पाने) २५ रुपये
- द न्यूज (२२ पाने) २५ रुपये
- पाकिस्तान ॲाब्जर्वर (२० पाने) २२ रुपये
- डेली दुनिया उर्दू
(१० पाने) २० रुपये
- रोजनामा जंग
(१२ पाने) २० रुपये
- पाकिस्तान दुडे
(१२ पाने) १५ रुपये