पुढील 5 दिवस मुसळधारेचे; राज्यात विविध भागात ‘जोर’धार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 05:19 AM2023-07-19T05:19:23+5:302023-07-19T05:19:48+5:30
रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यभरात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच वेग पकडला असून, राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत कोसळणाऱ्या मुसळधारांनी बळीराजाला दिलासा देण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील जलधारांची मुसंडी आता आणखी वाढणार असून, पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर घाट परिसराला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात मुसळधार
पुढील ५ दिवसांसाठी कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी पालघर आणि रायगडला रेड अलर्ट दिला आहे. पुढील २ दिवस मध्य भारताच्या काही भागात जोरदार ते खूप जोरदार पाऊस होईल. कोकणचा काही भाग, सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात पाऊस थोडा जास्त असेल. मराठवाड्यातील काही भागात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल.
- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त
१९ जुलै : रेड अलर्ट
पालघर, रायगड, पुणे, सातारा
२० जुलै : ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली
२० जुलै : ऑरेंज अलर्ट
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,
पुणे, सातारा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा
२१ जुलै : ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
राज्यात काय स्थिती?
कोल्हापूर : धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांत अधिक जोर
सांगली : कोयना, वारणा धरण क्षेत्रांत मुसळधार.
सातारा : महाबळेश्वरला सर्वाधिक १५० मिलिमीटर पावसाची नोंद
रत्नागिरी : जगबुडी नदीचे पाणी धोका पातळीजवळ पोहाेचू लागल्याने पुराची चिंता वाढली.
पूर्व विदर्भात हाहाकार, ४० गावांचा संपर्क तुटला
गडचिरोलीतील भामरागड तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. रस्ते पाण्याखाली गेले, ४० पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूरमध्ये शेकडो घरे पाण्याखाली गेली. गडचिरोली जिल्ह्यात एक वीजबळी आहे.
महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र