पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, संजय राऊतांनी भाजपाला डिवचले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 07:29 PM2018-10-18T19:29:42+5:302018-10-18T19:30:35+5:30

दादर येथील शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला मोठी गर्दी केली आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक दाखल झाले आहेत. यावेळी शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी

The next chief minister will be the Shiv Sena, Sanjay Rauta divides the BJP | पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, संजय राऊतांनी भाजपाला डिवचले 

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, संजय राऊतांनी भाजपाला डिवचले 

Next

मुंबई - शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सुरुवातील भाजपवर तोफ डागली. पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होता, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच इंधन दरवाढीवरुन सरकारने जनतेला फसवलं आहे, असे म्हणत मोदी सरकारलाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. 

दादर येथील शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला मोठी गर्दी केली आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक दाखल झाले आहेत. यावेळी शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मेळाव्याच्या सुरुवातीलाच खासदार संजय राऊत यांनी भाजपा सरकारला टार्गेट केलं. इंधन दरवाढीवरुन राऊत यांनी मोदी सरकारने फसवल्याचे म्हटले. तसेच येत्या काही दिवसांत लाटांचा कचरा साफ होईल, असे म्हणत मोदी लांटेवर निवडूण आलेल्या नेत्यांनाही राऊत यांनी टोला मारला. तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यंमत्री हा शिवसेनेचाच असेल, विधानभवनावर भगवाच फडकेल, असा आत्मविश्वासही राऊत यांनी बोलून दाखवला.   दरम्यान, केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेला मित्रपक्ष भाजपासोबत ताणलेले संबंध, आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा, राफेल विमान करार अशा अनेक मुद्द्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सरकारच्या धोरणांवर नाराज असलेल्या शिवसैनिकांकडून मोदी, फडणवीस यांच्याबरोबरच केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारविरोधात घोषणा दिल्या जात आहेत. 

Web Title: The next chief minister will be the Shiv Sena, Sanjay Rauta divides the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.