दुसऱ्या दिवशीही खातेधारकांची पैशांसाठी धावपळ सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 04:03 AM2019-09-26T04:03:33+5:302019-09-26T04:03:43+5:30

पीएमसी बँकेवरील निर्बंधांचा परिणाम; मुंबईतील अनेक शाखांमध्ये गर्दी कायम, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात

The next day, the account holders started running for money | दुसऱ्या दिवशीही खातेधारकांची पैशांसाठी धावपळ सुरुच

दुसऱ्या दिवशीही खातेधारकांची पैशांसाठी धावपळ सुरुच

Next

मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून, त्यामुळे काही लाख खातेदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. कांदिवली पूर्वेकडील हनुमाननगर येथील पीएमसी बँकेच्या शाखेमध्ये तसेच चेंबूर पूर्वेतील डायमंड गार्डन येथील बँकेच्या शाखेत मंगळवारप्रमाणेच बुधवारीही खातेधारकांनी गर्दी केली होती. एक हजार रुपये काढण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती.

हनुमाननगर येथील वस्तीत राहणाºया शेकडो सामान्य नागरिकांचे पैसे पीएमसी बँकेमध्ये जमा होतात. बँक आता सहा महिन्यांमध्ये प्रत्येक खातेधारकाला एक हजार रुपये देणार असून त्यामध्ये घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि इतर खर्च कसा भागवायचा, हा मोठा प्रश्न खातेदारांना सतावत आहे. बुधवारीही पीएमसी बँकांच्या विविध शाखांमध्ये पोलीस बंदोबस्तासह खासगी बाऊंसरही तैनात करण्यात आले होते. या वेळी खातेधारक थेट मोदी सरकारवर निशाणा साधत होते. तसेच इतर बँकांचे कर्मचारी खातेधारकांना येथे येऊन आपल्या विविध योजना समजावून सांगत असल्याचे पाहायला मिळाले.

बँकेने आठ दिवसांपूर्वी नोटीस द्यायला हवी होती. अचानक निर्णय घेतल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट होणार आहे, अशी नाराजी काही खातेधारकांनी व्यक्त केली. तर, अंगणवाडी क्रमांक ६ मध्ये काम करणाºया अंगणवाडी सेविकांचा सर्व पगार हा पीएमसी बँकेमध्ये जमा होतो. त्यांचा दोन दिवसांपूर्वीच पगार झाला असून अजूनही तो अंगणवाडी सेविकांच्या हातामध्ये आलेला नाही. त्यामुळे आता महिना काढायचा कसा? अशी संतप्त प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांनी दिली.

खातेदार - बँक कर्मचाऱ्यांमध्ये वाद
बँकेकडून ग्राहकांना केवळ एक हजार रुपये देण्यात येत असल्याने बुधवारीही ग्राहक बँक कर्मचाºयांशी वाद घालत असल्याचे चित्र पीएमसी बँकेच्या चेंबूर व धारावी शाखांत पाहायला मिळाले. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अनेकांना घरखर्च चालवणे अवघड
अंगणवाडी कर्मचाºयांच्या पगारासह विविध ठिकाणी काम करणाºया अनेक कर्मचाºयांनी आपल्या पगाराची खाती पीएमसी बँकेत काढली होती. त्यामुळे त्यांचा दरमहा पगार याच बँकेत जमा होत असे. आता अचानक या बँकेवर आरबीआयने निर्बंध घातल्याने पैसे काढायाचे कसे आणि घरखर्च चालवायचा कसा, असा प्रश्न काही संतप्त खातेधारकांनी उपस्थित केला. तर बँकेने याबाबत पूर्वकल्पना द्यालया हवी होती, अशी नाराजी अंगणवाडी क्रमांक ६ मध्ये काम करणाººया सेविकांनी व्यक्त केली.

Web Title: The next day, the account holders started running for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.