'शरद पवारांनी काळाची पावले ओळखावीत, भाजपाची लढाई वंचितसोबतच'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 06:09 AM2019-09-01T06:09:45+5:302019-09-01T06:11:01+5:30

देवेंद्र फडणवीस । शरद पवारांनी काळाची पावले ओळखावीत

 The next opposition leader is the deposed Bahujan front, devendra fadanvis | 'शरद पवारांनी काळाची पावले ओळखावीत, भाजपाची लढाई वंचितसोबतच'

'शरद पवारांनी काळाची पावले ओळखावीत, भाजपाची लढाई वंचितसोबतच'

Next

नांदेड : शरद पवार मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्यावर मी भाष्य करणार नाही, मात्र त्यांचा पक्ष अगोदरच ठराविक भागात मर्यादित होता़ अलिकडील दिवसांत पंतप्रधान मोदींच्या कामावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपमध्ये येत आहेत़ या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत भविष्य असल्याचे वाटत नसल्यानेच ते पक्ष सोडत आहेत़ पवारांनी ही काळाची पावले ओळखली पाहिजेत, अशी टिप्पणी करीत येणाºया विधानसभा निवडणुकीत भाजपची खरी लढत वंचित बहुजन आघाडीसोबत असेल़ निवडणुकीनंतर विरोधी पक्ष नेताही वंचितचाच दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकार परिषदेत केले़

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची १00 टक्के युती राहील, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले़ नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर शिवसेनेने आक्षेप घेतल्याबाबत विचारले असता, नारायण राणे हे सध्या भाजपमध्येच आहेत, ते भाजपाचे विद्यमान खासदार आहेत़ त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा विषय आहे़ याबाबतचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेऊन करण्यात येईल, असे ते म्हणाले़

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करीत होती, परंतु लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर वंचितची टीम ए तर काँग्रेसची टीम बी झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ विधानसभा निवडणुकीतही आमचा खरा सामना वंंचितसोबतच रंगेल, असे मुख्यमंत्री म्हणाले़

Web Title:  The next opposition leader is the deposed Bahujan front, devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.