येत्या सहा महिन्यात बेस्टच्या ताफ्यात ३०० एसी इलेक्ट्रिक बसगाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 04:28 AM2020-01-18T04:28:09+5:302020-01-18T04:28:24+5:30

सध्या बेस्टच्या ताफ्यात ४६ इलेक्ट्रिक बसगाड्या आहेत.

 In the next six months, 6 AC electric trains will be in the coffin of Best | येत्या सहा महिन्यात बेस्टच्या ताफ्यात ३०० एसी इलेक्ट्रिक बसगाड्या

येत्या सहा महिन्यात बेस्टच्या ताफ्यात ३०० एसी इलेक्ट्रिक बसगाड्या

Next

मुंबई : बेस्टच्या ताफ्यात येत्या सहा महिन्यांमध्ये ३०० वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या फेम २ या योजनेअंतर्गत या बसगाड्या येणार आहेत. यामध १४० मोठ्या वातानुकूलित बस व १६० मिडी वातानुकूलित बसगाड्यांचा समवेश आहे.
वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने व इंधन तेलावरील परकीय चलन वाचवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहने चालवण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. इलेक्ट्रिक बसगाडयांनाही केंद्र सरकारकडून सबसिडी मिळत असल्याने बेस्ट उपक्रमाने पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसगाड्या आपल्या ताफ्यात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात ४६ इलेक्ट्रिक बसगाड्या आहेत.

  • मोठ्या बसगाड्यांसाठी बेस्ट १० वर्षांकरिता ६६२ कोटी ३४ लाख रुपये मोजणार आहे.
  • १६० मिडी बसगाड्यांसाठी १० वर्षांसाठी ५९६ कोटी ७३ लाख ६० हजार रुपये देणार आहे.
  • दोन्ही प्रकारच्या बससाठी बेस्ट १० वषार्साठी १३५९ कोटी ७ लाख रुपये द्यावे लागणार आहे.
  • या बसगाड्या पुढील सहा महिन्यात बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील.

Web Title:  In the next six months, 6 AC electric trains will be in the coffin of Best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट