पुढील आठवड्यात एसटीच्या १५० जादा फेऱ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 06:02 PM2020-04-18T18:02:52+5:302020-04-18T18:03:28+5:30

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुविधा 

Next week 150 extra rounds of ST | पुढील आठवड्यात एसटीच्या १५० जादा फेऱ्या 

पुढील आठवड्यात एसटीच्या १५० जादा फेऱ्या 

googlenewsNext

 

मुंबई : राज्य सरकारने पुढील आठवड्यापासून संचार बंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंत्रालय, महानगरपालिका, आणि इतर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुविधेसाठी पुढील आठवड्यापासून एसटीच्या १५० जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

लाॅकडाऊन काळात राज्य सरकारने एसटी महामंडळ आणि बेस्ट प्रशासनाला अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार एसटीने मंत्रांलयीन कर्मचाऱ्यांची ने - आण करण्यासाठी मुंबई,ठाणे, पालघर या विभागातून अत्यावश्यक सेवा सुरु आहे. २१ एप्रिलपासून संचारबंदी शिथील करण्याचा येणार आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर येथून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ३०० एसटीच्या फेऱ्या सुरू आहे. मात्र, शासनाच्या प्रत्येक विभागात 30 टक्के कर्मचाऱ्यांची वाढ होणार असल्याने, एसटीच्या १५०  फेऱ्यांची वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्याने दिली.
--------------------------------------

  • ठाणे विभाग 
  • पासून - पर्यंत - फेऱ्या
  • बदलापूर - मंत्रालय - ८
  • मंत्रालय - बदलापूर - ८
  •  आसनगाव -मंत्रालय - ५
  • मंत्रालय - आसनगाव - ५  
  •   शहापूर - मंत्रालय - 3
  • मंत्रालय - शहापूर - 3  
  •  कल्याण - मंत्रालय - ७
  • मंत्रालय - कल्याण - ७
  • डोंबिवली - मंत्रालय - ७
  • मंत्रालय - डोंबिवली - ७
  • मिरारोड - मंत्रालय - ५
  • मंत्रालय - मिरारोड - ५ 

--------------------------------------

  • मुंबई विभाग 
  • पासून - पर्यंत - फेऱ्या
  • पनवेल - मंत्रालय - ९ 
  • मंत्रालय - पनवेल - ९

--------------------------------------

  • पालघर विभाग 
  • पासून - पर्यंत - फेऱ्या
  • विरार - मंत्रालय - ८
  • मंत्रालय- विरार - ८
  • पालघर - मंत्रालय - ८
  • मंत्रालय - पालघर - ८
  • वसई - मंत्रालय - ७
  • मंत्रालय - वसई - ७
  • नालासोपारा - मंत्रालय - ८
  • मंत्रालय - नालासोपारा -  ८

Web Title: Next week 150 extra rounds of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.