ना.घ. देशपांडे स्मारकासाठी समिती
By Admin | Published: May 13, 2017 01:31 AM2017-05-13T01:31:54+5:302017-05-13T01:31:54+5:30
साहित्यिक ना. घ. देशपांडे यांच्या भव्य स्मारक निर्मितीसाठी स्मारक समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. गेल्या दोन दशकांपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : साहित्यिक ना. घ. देशपांडे यांच्या भव्य स्मारक निर्मितीसाठी स्मारक समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. गेल्या दोन दशकांपासून या स्मारकासंबंधी साहित्य संमेलनातून ठराव व वेळोवेळी मागण्या करून झाल्या. आश्वासित करूनही अद्याप याबाबत काहीही झाले नाही. त्यामुळे लवकरच राष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक बुलडाणा मेहेकर येथे उभारण्यासाठी, ना. घ. देशपांडे स्मारक समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीत मेहेकर एज्युकेशन सोसायटीच्या उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उमा जोशी यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे नवे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी असणार आहेत. नुकत्याच या समितीच्या उभारणी वेळी घेण्यात आलेल्या सभेत जोशी म्हणाले की, ‘ना. घ. देशपांडे यांच्या स्मृतिदिनी व जयंतीनिमित्ताने मेहेकरमध्ये साहित्य, कविता, सामाजिकता इ. संबंधातील मोठी आयोजने केली जावीत.
या वेळी विदर्भाला भूषणावह ठरणार असलेल्या या स्मारकासाठी विदर्भीयांनी व सरकारने भरघोस व कृतिशील आर्थिक साहाय्य करावे,’ असे आवाहन जोशी यांनी या वेळी केले.