Join us

मुंबईजवळील न्हावा बेट आता बनणार पिकनिक स्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:06 AM

मुंबई : राज्य शासनाने मुंबईजवळ असणाऱ्या न्हावा बेटावर पर्यटकांच्या आकर्षणाच्या दृष्टीने पिकनिक स्पॉट तयार करण्याची योजना आखली आहे. यासाठी ...

मुंबई : राज्य शासनाने मुंबईजवळ असणाऱ्या न्हावा बेटावर पर्यटकांच्या आकर्षणाच्या दृष्टीने पिकनिक स्पॉट तयार करण्याची योजना आखली आहे. यासाठी न्हावा येथील ऐतिहासिक एलिफंटा बेटाच्या कडेला असणारी तीन बाजूंची व करंजडे आणि ठाणे खाडी लगत असलेली सुमारे ६० हेक्टर जमीन सिडकोने ताब्यात घेतली आहे. या बेटावर मेगा टुरिझम प्रकल्प विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

नवी मुंबईच्या विकास आराखड्यानुसार हे क्षेत्र आरपीझेडअंतर्गत येते. ६० हेक्टर क्षेत्रांपैकी ३० हेक्टर क्षेत्र हे सीआरझेड अंतर्गत येते. राज्य सरकारच्या नगररचना विभागाच्या मते ही संपूर्ण जागा पर्यटन, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी वापरता येऊ शकते आणि सहलीचे ठिकाण म्हणून विकसित केले जाऊ शकते. शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर सी-लिंकच्या अगदी जवळ असल्याने ही जागा मुंबईकरांसाठी देखील सहलीचे चांगले ठिकाण बनू शकते.

या ठिकाणाच्या विकासासाठी सिडकोने ईओआय अर्ज मागविले असून ते दोन जुलैपर्यंत सादर करावे लागणार आहेत.

सिडकोने नवी मुंबईचे उत्तर व दक्षिण भागात विभागलेले १४ नोड्स विकसित केले आहेत. त्यात

ऐरोली, कोपरखैराणे, वाशी, सानपाडा, नेरुळ, बेलापूर, तर दक्षिण नोड्स खारघर, कामोठे, कळंबोली, पुष्पक, पनवेल, उलवे आणि द्रोणागिरी यांचा समावेश आहे. विकसित केले जाणारे न्हावा बेट उलवे येथून पाच किलोमीटर अंतरावर असल्याने याला पर्यटनदृष्ट्या महत्त्व प्राप्त होणार आहे.