‘एनआयए’कडून गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:06 AM2021-03-19T04:06:39+5:302021-03-19T04:06:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ स्फोटक कार ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेला सहायक ...

NIA to probe senior crime branch officials soon | ‘एनआयए’कडून गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच चौकशी

‘एनआयए’कडून गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच चौकशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ स्फोटक कार ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेला सहायक निरीक्षक सचिन वाझे हा प्रत्येक कामात थेट पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना रिपोर्टिंग करत असल्याची माहिती ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना मिळाली. अन्य गुन्ह्यांप्रमाणे या प्रकरणाचा तपास वाझेकडे देण्यात आला आहे का? याबाबत लवकरच क्राईम ब्रँचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चाैकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘एनआयए’ने हे प्रकरण चौकशीसाठी हाती घेतल्यानंतर वेगाने हालचाली होताना दिसत आहेत. जिलेटिन कार प्रकरण वाझेकडे का दिले, प्रमुख तपास अधिकारी म्हणून वाझेला काेणी, कशासाठी नेमले, त्याबाबत योग्य प्रक्रिया राबविण्यात आली का, याबद्दलची माहिती त्याच्याकडून घेतली जाईल. येत्या एक-दोन दिवसांत त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. वाझे ‘सीआययू’त नियुक्त होता. हा विभाग मुंबई क्राईम ब्रांचच्या अंतर्गत येतो. त्यामुळे वाझेचे डिटेक्शन क्राईम ब्रांचचे उपायुक्त प्रकाश जाधव, अपर आयुक्त वीरेश प्रभू व सहआयुक्त मिलिंद भारंबे हे वरिष्ठ होते. त्यांना रिपोर्ट करणे वाझेला बंधनकारक होते. मात्र, वाझे थेट पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या संपर्कात होता. त्यामुळे स्फोटक कार प्रकरणात त्याने अशाच पद्धतीने तपास करण्यात येत होता का, त्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांना जाणून घ्यायची आहे.

........................

Web Title: NIA to probe senior crime branch officials soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.