Sachin Vaze: NIA सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार; प्रकरणाचं गूढ लवकरच उलगडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 12:52 PM2021-03-15T12:52:18+5:302021-03-15T12:53:31+5:30

Sachin Vaze: सचिन वाझेंच्या विरोधात एनआयच्या हाती भक्कम पुरावे; वाझेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता

nia is probing if mumbai police officer sachin waze was present at mukesh ambani house antilia | Sachin Vaze: NIA सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार; प्रकरणाचं गूढ लवकरच उलगडणार?

Sachin Vaze: NIA सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार; प्रकरणाचं गूढ लवकरच उलगडणार?

googlenewsNext

अंबानींच्या घराबाहेर पीपीई किट घालून दिसलेली 'ती' व्यक्ती सचिन वाझेच?; एनआयएला संशय
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास करताना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हाती काही भक्कम पुरावे लागले आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्या आहेत. अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेली स्कॉर्पिओ गाडी व्यवसायिक मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. हिरेन यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला. तेव्हापासून सचिन वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

पोलीस मुख्यालय, मुलुंड टोलनाका अन् बदललेल्या नंबर प्लेट्स; वाझेंच्या अटकेमागचं कारण समोर

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळून आली. ही कार हिरेन यांच्या मालकीची होती. याशिवाय हिरेन यांच्या मालकीची एक इनोव्हा गेल्या काही महिन्यांपासून वाझे वापरत होते. या दोन्ही कार काही वेळा एकत्र दिसल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तशी दृश्यं रेकॉर्ड झाली. त्यामुळे वाझे यांच्या अडचणीत भर पडली आहे. मुकेश अंबानींच्या घराबाहेर मध्यरात्री इनोव्हा कारमधून एक व्यक्ती उतरली होती. ती व्यक्ती नेमकी कोण याचा तपास एनआयए करत आहे.

सचिन वाझेंनी चौकशीत घेतलं बड्या अधिकाऱ्याचं नाव; दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळखही पटली

अंबानींच्या घराबाहेर दिसलेल्या इनोव्हा कारमधून उतरलेल्या व्यक्तीनं स्वत:ची ओळख लपवण्यासाठी पीपीई किट परिधान केला होता. ही व्यक्ती सचिन वाझेच होती का, या दिशेनं एनआयएनं तपास सुरू केला आहे. पीपीई किट घातलेली व्यक्ती वाझेच होते का हे पडताळून पाहण्यासाठी एनआयचे अधिकारी वाझेंना पीपीई किट घालून चालायला सांगणार आहेत. चालण्याच्या पद्धतीवरून काही गोष्टी हाती लागतात, या दृष्टीनं एनआयएचे प्रयत्न सुरू आहेत.

वाझेंच्या विरोधात एनआयएकडे भक्कम पुरावे
वाझेंच्या विरोधात काही भक्कम पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. वाझे वापरत असलेली गाडी २४ फेब्रुवारी आणि १३ मार्चला मुंबईतल्या पोलीस मुख्यालयातून बाहेर पडताना दिसत आहे. हे दोन्ही सीसीटीव्ही फुटेज एनआयएकडे आहेत. वाझे यांच्याकडे असलेली इनोव्हा कार २४ मार्चला ठाण्यात गेली. याच दिवशी कारची नंबर प्लेट बदलली गेल्याचा संशय एनआयएला आहे. 

२५ फेब्रुवारीला ठाण्यातून आलेली इनोव्हा कार मुलुंड टोलनाक्यावर दिसली. यावेळी कारचा नंबर MH ०४ AN **** असा होता. त्यानंतर इनोव्हा कार प्रियदर्शनी परिसरात रात्री १.४० ला स्कॉर्पिओ कारजवळ पोहोचली. रात्री २ वाजून १८ मिनिटांनी दोन्ही कार अंबानींच्या घराजवळ दिसल्या. दोन्ही कारचे चालक तिथून फरार झाले. याच स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या काड्या आढळून आल्या. यानंतर रात्री ३ वाजून ३ मिनिटांनी इनोव्हा कार मुलुंड टोलनाका ओलांडताना दिसली. त्यावेळी गाडीचा नंबर MH04 AN**** होता. 

Web Title: nia is probing if mumbai police officer sachin waze was present at mukesh ambani house antilia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.