लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध (पीएफआय) धडक कारवाई सुरू असून, रविवारी महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
धक्कादायक बाब म्हणजे २०४७ पर्यंत देशाला इस्लामिक राष्ट्र बनविण्यासाठी पीएफआयच्या एजंटांकडून देशविघातक कारवायांसाठी गरीब तरुणांना टार्गेट करत शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे या छापेमारीत उघडकीस आले आहे. या तरुणांची माथी भडकाविण्याचे काम पीएफआय करीत आहे. कन्नूर, मलप्पुरम, दक्षिण कन्नड, नाशिक, कोल्हापूर, मुर्शिदाबाद आणि कटिहार जिल्ह्यांतील एकूण १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले.
या कारवाईत कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या हालचालींबाबत महत्त्वपूर्ण पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. कागदपत्रांसह अनेक डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.